NCET परीक्षेचा निकाल जाहीर 

शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी  ९ ऑगस्ट 2023 रोजी NCET परीक्षा आयोजित करण्यात आली होती.  देशभरातील  १२७ शहरात १३ भाषांमधून ही परीक्षा घेण्यात आली.

NCET परीक्षेचा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट (NCET) चा निकाल जाहीर केला आहे.  उमेदवार ncet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइट वर निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : शिक्षण ब्रेकिंग न्यूज : विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. पराग काळकर याची नियुक्ती

शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी  ९ ऑगस्ट 2023 रोजी NCET परीक्षा आयोजित करण्यात आली होती.  देशभरातील  १२७ शहरात १३ भाषांमधून ही परीक्षा घेण्यात आली. NCET परीक्षेत  IIT, NIT, RIE आणि सरकारी महाविद्यालयांसह एकूण ४२ केंद्रीय/ राज्य विद्यापीठे / संस्थांनी भाग घेतला होता. 
ही संगणक आधारित परीक्षा इंग्रजी, मराठी, हिंदी,  आसामी, बंगाली,  गुजराती, कन्नड, मल्याळम,  पंजाबी, उडिया, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये घेण्यात आली होती.  NCET  ची प्रश्नपत्रिका चार विभागात विभागण्यात आली होती. पहिल्या विभागात, उमेदवारांना ३३ वेगवेगळ्या भाषांमधून दोन भाषा निवडायच्या होत्या. प्रत्येक निवडलेल्या भाषेत २० प्रश्न होते. परीक्षेनंतर १४ ऑगस्ट रोजी उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट होती.२०२३-२०२४ या शैक्षणिक सत्रासाठी IIT, NIT, RIE आणि सरकारी महाविद्यालयांसह निवडक केंद्रीय/राज्य विद्यापीठे/संस्थांमध्ये ४ वर्षीय एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) मध्ये प्रवेश घेण्यासाठी ही  योजित करण्यात आली होती. 

-----------------------------

असा पहा निकाल 


* NCET च्या अधिकृत वेबसाइट ncet.samarth.ac.in ला भेट द्या.

* साइन इन लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल.

* आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

* तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

* निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या.