प्र- कुलगुरू पदी नियुक्त झाल्यावर काय म्हणाले डॉ. पराग काळकर

नवीन शैक्षणिक धोरण संलग्न महाविद्यालामधील सर्व घटकांना सोबत घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कुलगुरू याचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधील सर्व महाविद्यालय, शिक्षक, आणि विद्यार्थी यांचे प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडवण्यास प्रयत्न करणार आहे . 

प्र- कुलगुरू पदी नियुक्त झाल्यावर काय म्हणाले डॉ. पराग काळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात अंमलबजावणी कारणे,संशोधनाला अधिक चालना देणे, सर्व घटकांना बरोबर घेऊन विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थांचालक यांचे प्रश्न सोडवता  विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी 'एज्युवार्ता'शी संवाद साधताना सांगितले.

विद्यापीठाच्या रखडलेल्या प्र-कुलगुरू निवड प्रक्रियेवर अखेर शनिवारी पडदा पडला.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डॉ.पराग काळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले.विद्यापीठाची प्र कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया अनेकांनी प्रतिष्ठेची केली होती.मात्र,काळकर यांच्या नावाला सर्वांनी एकमातीने सांमती दिली.

डॉ पराग चंद्रकांत काळकर यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त  केली असून,  व्यवस्थापन विषयांमध्ये  पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांचे सर्व शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात झाले.गेली  २५ हून अधिक वर्ष ते पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  आय आय एम अहमदाबाद येथून त्यांनी पूर्णवेळ फैकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दोन वेळा पदव्युत्तर शिक्षक या गटामधून सिनेटवर प्रतिनिधित्व केले असून,तेरा वर्षापेक्षा अधिक काळ व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.सध्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम केल आहे.  त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध असून व्यवस्थापन आणि वाणिज्य या विषयांमध्ये पुस्तकही प्रकाशित केली आहेत.असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स या राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन संस्थांच्या  संघटनेचे ट्रेझर म्हणूनही ते काम करत आहेत.

---------------

प्र- कुलगुरू पदासाठी संधी दिल्याबद्दल  कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांचे मन:पूर्वक आभार. सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सहभागी होऊन नवीन शैक्षणिक धोरण संलग्न महाविद्यालामधील सर्व घटकांना सोबत घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कुलगुरू याचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधील सर्व महाविद्यालय, शिक्षक, आणि विद्यार्थी यांचे प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडवण्यास प्रयत्न करणार आहे . 

- डॉ पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ