दहशतवादी कृत्यांना थारा देणाऱ्या शाळेची खैर नाही; शिक्षण विभागाचे अधिकारी पोहचले शाळेत

बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (PFI) शाळेच्या दोन माजल्यांचा वापर मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनविण्यासाठी केला जात होता.

दहशतवादी कृत्यांना थारा देणाऱ्या  शाळेची खैर नाही; शिक्षण विभागाचे अधिकारी पोहचले शाळेत
NIA seizes 2 floors of a school in Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दहशतवादी कृत्यासाठी पुण्यातील शाळेचा वापर केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केलेल्या कारवाईतून समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने (Education Department) सुद्धा संबंधित शाळेची चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे महापालिकेच्या (PMC) शिक्षण विभागातील अधिकारी ब्ल्यू बेल्स शाळेच्या (Blue Bells School) चौकशीसाठी रवाना झाले आहेत. (Terrorist Activities in School News)

बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (PFI) शाळेच्या दोन माजल्यांचा वापर मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनविण्यासाठी केला जात होता. त्यानंतर त्या तरूणांना विशिष्ट समाजातील नेते व संस्थांवर हल्ले तसेच हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. पीएफआयकडून मुस्लिम तरूणांना आपल्या जाळ्यात ओढून भारतात २०४७ अखेरपर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपविण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित केले जात असल्याचे एनआयएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई झाल्यानंतर शिक्षण विभागाने शाळेची चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचा एक गट पाठवला आहे. सकाळी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी शाळेची चौकशी करण्यासाठी रवाना झाल्या असल्याचे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने शाळेचे दोन मजले जप्त केले आहेत. ब्लु बेल्स शाळेच्या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला जप्त केला आहे. दहशतवादी कृत्यांची तयारी याठिकाणी केली जात होती. पीएफआयकडून मुस्लिम तरूणांना आपल्या जाळ्यात ओढून भारतात २०४७ अखेरपर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपविण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित केले जात होते, तरुणांना चाकूसह इतर धोकादायक शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, असा दावा एनआयएने केला आहे.

एनआयएने मागील वर्षी २२ सप्टेंबर महिन्यात शाळेच्या इमारतीतील या दोन मजल्यांची झडती घेतली होती. या मजल्यांवरील खोल्यांमध्ये केलेल्या तपासांत हाती आलेल्या दस्तऐवजांनुसार जागेचा वापर केडरसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचे आढळून आले आहे. दशतवादी कृत्यांसाठी या तरुणांना प्रवृत्त केला जात होते, असा दावा एनआयएने केला आहे.