UGC NET डिसेंबर परीक्षेचा निकाल  जाहीर 

NTA ने ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर UGC NET निकाल २०२३ लिंक देखील सक्रिय केली आहे.

UGC NET डिसेंबर परीक्षेचा निकाल  जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UGC NET डिसेंबर २०२३ च्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) डिसेंबर २०२३ चा निकाल जाहीर केलाआहे. NTA ने ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर UGC NET निकाल २०२३ लिंक देखील सक्रिय केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निदेशानुसार नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे नेट परीक्षा घेतली जाते.या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख लॉग इन करून  निकाल पाहू शकतात.तसेच  स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात. UGC NET निकालाच्या घोषणेची अधिकृत माहिती NTA ने प्रथम १० जानेवारी आणि नंतर १७ जानेवारीला दिली होती. मात्र, पहिल्यांदा नैसर्गिक आपत्तीमुळे आणि दुसऱ्यांदा तांत्रिक कारणांमुळे रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात आल्याने निकाल पुढे ढकलण्यात आला होता. NTA ने UGC NET डिसेंबर २०२३ ची परीक्षा १९ डिसेंबर पर्यंत दोन टप्प्यात घेतली होती.

हेही वाचा : वयाच्या 21व्या वर्षीच विनायकने गाजवलं एमपीएससीचं मैदान ; आधी उपशिक्षण अधिकारी , आता राज्यात प्रथम

उमेदवारांना  UGC NET प्रमाणपत्र नंतर जारी केले जाईल. हे प्रमाणपत्र UGC NET ब्युरोद्वारे जारी केले जाईल, जे उमेदवार ब्यूरोच्या अधिकृत वेबसाइट ugcnetonline.in वरून डाउनलोड करू शकतील, असे निर्देश NTA कडून देण्यात आले आहेत. या प्रमाणपत्राद्वारेच उमेदवार सहाय्यक प्राध्यापक किंवा JRF च्या भरतीसाठी अर्ज करू शकतील,असेही एनटीएने स्पष्ट केले आहे.