SPPU : विद्यापीठाच्या विभागांमधील प्रवेशाची प्रक्रिया झाली सुरू 

विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले.

SPPU : विद्यापीठाच्या विभागांमधील प्रवेशाची  प्रक्रिया झाली सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University)परिसरातील विविध विभागातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश पूर्व परीक्षेसाठी (Pre-Entrance Examination)अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. विद्यापीठातील पदवी व पदव्‍युत्तरच्‍या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या प्रवेश परीक्षेसाठी २० एप्रिलपासून अर्ज स्वीकारले (Applications accepted from 20 April)जात असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत आहे.

विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले. त्‍यानुसार आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी २० दिवसांची मुदत दिली आहे. पदवी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश परीक्षा १३ जून रोजी, तर पदव्‍युत्तरसाठी परीक्षा १४ ते १६ जून या दरम्‍यान होण्याची शक्‍यता आहे.प्रवेश परीक्षा १०० गुणांची असून, त्‍यासाठी दोन तासांचा अवधी आहे.  प्रवेश परीक्षा ही  आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.

विद्यार्थ्यांनी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज  केल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष प्रवेश दिले जाते. विद्यापीठात प्रवेश मिळणे, हे बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात. प्रवेशाची सविस्‍तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.