UGC NETपरीक्षेत मोठे बदल ;बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना देता येणार परीक्षा; एम.जगदीश कुमार यांची घोषणा 

जे उमेदवार 4 वर्षाच्या किंवा 8 सेमिस्टरच्या बॅचलर डिग्री प्रोग्रामच्या अंतिम सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील UGC NET जून 2024 सत्रासाठी अर्ज करू शकतील.

UGC NETपरीक्षेत मोठे बदल ;बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना देता येणार परीक्षा; एम.जगदीश कुमार यांची घोषणा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UGC NET बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार (UGC Chairman M. Jagdish Kumar)यांनी आपल्या X हँडल वरून याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 20 एप्रिल म्हणजे आजपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यूजीसी नेट परीक्षा जून 2024 (NET Exam June 2024)साठी अर्ज सुरू करू शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवार ugcnet.nta.ac.in वर भेट देऊन अर्ज करू शकतील. 

 यावर्षी लागू होणाऱ्या परीक्षेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे उमेदवार 4 वर्षाच्या किंवा 8 सेमिस्टरच्या बॅचलर डिग्री प्रोग्रामच्या अंतिम सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील UGC NET जून 2024 सत्रासाठी अर्ज करू शकतील. विशेष म्हणजे आता उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विषयात पीएचडी करता येणार आहे. त्यांनी कोणत्या अभ्यासक्रमातून पदवी घेतली आहे, हे महत्त्वाचे असणार नाही. कुमार म्हणाले, “4 वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्राम करत असलेले विद्यार्थी त्यांना ज्या विषयात 4 वर्षांची बॅचलर पदवी मिळाली आहे,त्या विषयात पीएचडी करू शकतात.

याशिवाय उमेदवार परीक्षेशी संबंधित अपडेट्ससाठी NTA च्या https://exams.nta.ac.in/ या नवीन वेबसाइटलाही भेट देऊ शकतात, अशी माहिती जगदीश कुमार यांनी दिली आहे. 


पूर्वी काय नियम होते?
यापूर्वी UGC NET साठी पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य होते. उमेदवार त्याच विषयात पीएचडी करू शकतात ज्यामध्ये त्यांनी 2 वर्षांची पीजी पदवी केली आहे. मात्र नियमात दुरुस्ती केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. त्यांना आता पदव्युत्तर पदवीची गरज भासणार नाही.