NEET MDes : कौन्सिलिंगसाठी 1 जुलै पासून नोंदणी

समुपदेशनासाठी नोंदणी १ जुलैपासून सुरू होणार आहे.

NEET MDes : कौन्सिलिंगसाठी 1 जुलै पासून नोंदणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

वैद्यकीय समुपदेशन समितीने(Medical Advisory Committee) NEET MDes समुपदेशनाचे वेळापत्रक(counselling Timetable) प्रसिद्ध केले आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, नीट मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी (NEET Masters of Dental Surgery (MDS)) समुपदेशनासाठी नोंदणी (counselling Registration) १ जुलैपासून सुरू होणार आहे. 

कौन्सिलिंगसाठी एकूण तीन फेऱ्यां घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अंतिम ऑनलाइन स्ट्रे वैकेंसी राउंड  घेतला जाणार आहे. ही समुपदेशन फेरी NEET MDS  50 टक्के अखिल भारतीय कोटा आणि 100 टक्के डीम्ड/केंद्रीय विद्यापीठांसाठी असणार आहे.

या समुपदेशनांतर्गत, उमेदवारांना १ ते ७ जुलै दरम्यान नोंदणी करून शुल्क जमा करावे लागेल. केवळ नोंदणीकृत उमेदवारच पुढील प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. 2 ते 7 जुलै दरम्यान चॉईस फिलिंग करता येईल. तर चॉईस लॉकिंगचा पर्याय 7 जुलै रोजी दुपारी 4 ते रात्री 11:55 पर्यंत खुला असणार आहे.

यानंतर 8 ते 9 जुलै दरम्यान जागा वाटपाची प्रक्रिया होईल आणि 10 जुलैला निकाल जाहीर होईल. त्यानंतर उमेदवाराला 11 ते 17 जुलै दरम्यान वाटप केलेल्या संस्थेत अहवाल द्यावा लागेल. उमेदवार एमसीसी (Medical Counseling Committee) च्या वेबसाइटला भेट देऊन समुपदेशनाशी संबंधित इतर सर्व माहिती पाहू शकतात.