UGC NET 2024 : NTA चा घुमजाव ; आता परीक्षा ऑनलाईनच ; 21 ऑगस्ट पासून परीक्षा 

UGC NET जून 2024 परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

UGC NET 2024 : NTA चा घुमजाव ; आता परीक्षा ऑनलाईनच ; 21 ऑगस्ट पासून परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नॅशनल टेस्टिंग एजन्सीने  (NTA) विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) 2024 जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी NTA ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या  21 ऑगस्ट पासून होणारी ही परीक्षा आधी ठरल्या प्रमाणे ऑफलाइन (Offline)न होता आता ऑनलाईन (Online)घेतली जाणार आहे. 
एजन्सीने UGC NET 2024 परीक्षा ऑनलाइन संगणक-आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान या वर्षी 18 जून रोजी झालेली  UGC-NET परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. मात्र परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा आता ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, UGC NET जून 2024 परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. याव्यतिरिक्त, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संयुक्त परिषद-विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा (CSIR UGC NET) 25 ते 27 जुलै दरम्यान संगणक-आधारित चाचणी मोडमध्ये आयोजित केली जाईल. या दोन्ही परीक्षा भारतीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये लेक्चरशिप आणि रिसर्च फेलोशिप मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी घेतल्या जातात.