#होय_पेटवतोय_मी_महाराष्ट्र! विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार मैदानात, उद्या उपोषण

स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे सकाळी १० वाजता लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.

#होय_पेटवतोय_मी_महाराष्ट्र! विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार मैदानात, उद्या उपोषण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्याकडून स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार, परीक्षा शुल्क, रखडलेली भरती (Recruitmant) याविरोधात आवाज उठवला जात आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी ट्विट करत भाजपची (BJP) ट्रोल गँग आपल्याला ट्रोल करत असल्याचा आरोप केला होता. विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं म्हणजे महाराष्ट्र (Maharashtra) पेटवणं असेल तर #होय_पेटवतोय_मी_महाराष्ट्र!, असे म्हणत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनी पुण्यात उपोषण  (Hunger Strike) करण्याची घोषणा केली आहे.

 

स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे सकाळी १० वाजता लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. स्पर्धा परीक्षांच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच रोहित पवार थेट मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता त्यांना विद्यार्थ्यांकडून किती साथ मिळणार हे पाहावे लागेल.

एज्युवार्ता बाल गणेशोत्सव स्पर्धा ; खास शालेय विद्यार्थ्यांसाठी , बक्षिसांची लयलूट करण्याची संधी

 

दरम्यान, सकाळी केलेल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली होती. त्यांनी म्हटले आहे की, भाजपची ट्रोल गँग माझ्या विरोधात कालपासून अचानक सक्रीय होऊन मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या ट्रोल गँगचा विषय काय तर रोहित पवार राज्यातल्या युवकांना पेटवत आहे. एक महिन्यापूर्वीची फोन क्लिप व्हायरल केली जातेय, ज्यात मी म्हणत आहे की, “परीक्षा फी च्या विषयात सरकार काही ऐकत नाही त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. काही लोकांना आंदोलन करायला सांगितले आहे त्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही”.

 

सरकारने #serious पणे सांगावं यात काही चुकीचं आहे? सरकारने #परीक्षा_फी च्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लुटमार करायची, पेपरफुटी होत असताना दुर्लक्ष करायचं, कंत्राटीकरणाला बळ द्यायचं, युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ मांडायचा. आता या विषयांवर सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं असेल तर #होय_पेटवतोय_मी_महाराष्ट्र!, असे पवार यांनी नमूद केले आहे.

 

तुम्हाला महाराष्ट्र पेटू द्यायचा नसेल तर #पेपरफुटी संदर्भात कायदा करा, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटलेली #परीक्षा_फी परत करा, #कंत्राटी_भरतीचा निर्णय रद्द करा. विद्यार्थ्यानी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार झोपेचं सोंग घेत असेल, या सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचणार नसेल तर या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर तर उतरावंच लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j