MSBTE डिप्लोमा २०२४ चा निकाल जाहीर

ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा दिली होती. ते MSBTE च्या अधिकृत वेबसाइट msbte.org.in वर त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा आसन क्रमांक टाकून त्यांची मार्कशीट ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.

MSBTE डिप्लोमा २०२४ चा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 MSBTE परीक्षेच्या निकाल कधी लागणार या  प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) शनिवार (दि.२९ )डिप्लोमा उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल (Diploma Summer Exam Result 2024) जाहीर केला आहे. त्यापुर्वी निकालाच्या वेळेबाबत अधिकृत घोषणा (Official announcement) करण्यात आली होती. ज्या  विद्यार्थ्यांनी दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा दिली होती. ते MSBTE च्या अधिकृत वेबसाइट msbte.org.in वर त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा आसन क्रमांक टाकून त्यांची मार्कशीट ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.

MSBTE उन्हाळी परीक्षा २३ एप्रिल ते १६ मे, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या. डिप्लोमा परीक्षा (थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही) उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात किमान ४०% गुण मिळवणे आवश्यक आहे. थिअरी परीक्षांसाठी किमान उत्तीर्ण गुण १०० पैकी ४० आहेत.  प्रात्यक्षिक परीक्षांसाठी ५० पैकी २० आहेत. 

MSBTE डिप्लोमा निकाल 2024 कसा करा डाउनलोड 

प्रथम msbte.org.in वर अधिकृत MSBTE वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, "MSBTE Diploma Summer 2024 Results" साठी निकालाची लिंक शोधा. तुमचा नावनोंदणी क्रमांक किंवा आसन क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. "Show My Result" वर क्लिक करा. तुमचे परीक्षेचे निकाल पहा आणि भविष्यातील संदर्भासाठी मार्कशीट डाउनलोड करा.