महाराष्ट्रातील ७१ जण होणार IAS, IPS; रँकसह त्यांची नावे इथे वाचा  

महाराष्ट्रात पहिले पाच क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसते. त्यामध्ये कश्मिरासह अंकिता पुवार, रुचा कुलकर्णी, आदिती वषर्णे आणि दिक्षिता जोशी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ७१ जण होणार IAS, IPS; रँकसह त्यांची नावे इथे वाचा  
Dr. Kashmira sankhe felicited by CM eknath shinde

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत देशातील एकूण ९३३ उमेदवार यशस्वी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) ७० हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे. एकण निकालामध्ये हे प्रमाण १२ टक्के आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे (Kashmira Sankhe) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशाच्या गुणवत्ता यादीत ती २५ व्या क्रमांकावर आहे. (UPSC 2022 Result)

यूपीएससीने मंगळवारी नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. निकालामध्ये पहिल्या दहात मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चारही क्रमांकावर मुलींनी स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्रातही पहिले पाच क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसते. त्यामध्ये कश्मिरासह अंकिता पुवार, रुचा कुलकर्णी, आदिती वषर्णे आणि दिक्षिता जोशी यांचा समावेश आहे.

वर्षभरापूर्वी IPS, पण IAS व्हायचं स्वप्न शांत बसू देईना! सलग दुसऱ्यांदा केली यूपीएससी क्रॅक

महाराष्ट्रातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. ‘भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्वच यशंवत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. या सर्वांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचीही साथ महत्त्वाची ठरते. म्हणूनच या यशस्वी उमेदवारांसह, त्यांच्या कुटुंबियांचेही अभिनंदन. या सर्व यशस्वींकडून प्रशासकीय सेवेच्या आपल्या माध्यमातून समाजाची,पर्यायाने राज्य आणि देशाची सेवा घडेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार (कंसात गुणवत्ता यादीतील क्रमांक) -

कश्मिरा संखे (२५), अंकिता पुवार (२८), रूचा कुलकर्णी (५४), आदिती वषर्णे (५७), दिक्षिता जोशी (५८), श्री मालिये (६०), वसंत दाभोळकर (७६), प्रतिक जरड (११२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंडेपाटील (१४६), ऋषिकेश शिंदे (१८३), अर्पिता ठुबे (२१४), सोहम मनधरे (२१८), दिव्या गुंडे (२६५), तेजस अग्निहोत्री (२६६), अमर राऊत (२७७), अभिषेक दुधाळ (२७८), श्रुतिषा पाताडे (२८१), स्वप्निल पवार (२८७), हर्ष मंडलिक (३१०), हिमांषु सामंत (३४८), अनिकेत हिरडे (३४९), संकेत गरूड (३७०), ओमकार गुंडगे (३८०), परमानंद दराडे (३९३), मंगेश खिल्लारी (३९६), रेवैया डोंगरे (४१०), सागर खरडे (४४५), पल्लवी सांगळे (४५२), आशिष पाटील (४६३), अभिजित पाटील (४७०), शुभाली परिहार (४७३), शशिकांत नरवडे (४९३), रोहित करदम (५१७), शुभांगी केकण (५३०), प्रशांत डगळे (५३५), लोकेश पाटील (५५२), ऋतविक कोत्ते (५५८), प्रतिक्षा कदम (५६०), मानसी साकोरे (५६३), सैय्यद मोहमद हुसेन (५७०), पराग सारस्वत (५८०), अमित उंदिरवडे (५८१), श्रुति कोकाटे (६०८), अनुराग घुगे (६२४), अक्षय नेरळे (६३५), प्रतिक कोरडे (६३८), करण मोरे (६४८), शिवम बुरघाटे (६५७), राहुल अतराम (६६३), गणपत यादव (६६५), केतकी बोरकर (६६६), प्रथम प्रधान (६७०), सुमेध जाधव (६८७), सागर देठे (६९१), शिवहर मोरे (६९३), स्वप्निल डोंगरे (७०७), दिपक कटवा (७१७),  राजश्री देशमुख (७१९), महाऋद्र भोर (७५०), अंकित पाटील (७६२), विक्रम अहिरवार (७९०), विवेक सोनवणे (७९२), स्वप्निल सैदाने (७९९), सौरभ अहिरवार (८०३), गौरव अहिरवार (८२८), अभिजय पगारे (८४४), तुषार पवार (८६१), दयानंद तेंडोलकर (९०२), वैषाली धांडे (९०८), निहाल कोरे (९२२).

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (IAS) या सेवेत एकूण १८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ७५, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १८, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – ४५, अनुसूचित जाती (एस.सी.) – २९, अनुसूचित जमाती (एस.टी.) – १३ जागा रिक्त आहेत.

भारतीय विदेश सेवा (IFS) या सेवेत एकूण ३८ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – १५, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) - ०४,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – १०, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) – ०३ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (IPS) या सेवेमध्ये एकूण – २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – ८३,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०,  इतर मागास प्रवर्गातून - ५३, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ३१, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – १३  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - ४७३ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - २०१, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  ४५, इतर मागास प्रवर्गातून - १२२, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ६९ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ३६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – १३१ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - ६०, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १२, इतर मागास प्रवर्गातून - ३३, अनुसूचित जाती प्रवर्गातून – १९ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ०७ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.