नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 'लॉटरी'; सर्वांनाच परीक्षेची एक संधी

विविध विद्यार्थी संघटनांनी इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॅरी ऑन लागू करावे, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केले होते.

नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 'लॉटरी'; सर्वांनाच परीक्षेची एक संधी
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन (Carry On) ची संधी द्यावी, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) आंदोलन केले होते. विद्यापीठाने त्यावर निर्णय घेत विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय या अभ्यासक्रमाच्या सर्वच प्रथम व द्वितीय वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे 'कॅरी ऑन'च्या मागणीमुळे इतर विद्यार्थ्यांची सुद्धा लॉटरी लागली आहे. (Savitribai Phule Pune University News)

 

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने कॅरी ऑनची संधी दिली. त्याच पार्श्वभूमीवर विविध विद्यार्थी संघटनांनी इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॅरी ऑन लागू करावे, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळामध्ये याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार उन्हाळी २०२३ परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये विशेष प्रवेश संधी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

रँगिंगप्रकरणी एकाचवेळी तब्बल ७२ विद्यार्थ्यांवर कारवाई; दहा जण निलंबित

 विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता किंवा जेथे लागू असेल तेथे द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सहाव्या सत्रा करिता तात्पुरता प्रवेश काही अटी व शर्तींच्या अधिन दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्याकडून हमीपत्र लिहून घेणे अनिवार्य असेल.

 

तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रामध्ये अथवा चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्रामध्ये तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी त्यात अध्ययन, प्रात्यक्षिके, सत्रकर्म, फिल्ड  व्हिजिट व इतर बाबी महाविद्यालयाने नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्ण करून घेणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर परीक्षा व इतर बाबी या हिवाळी २०२३ (ऑक्टोबर) परीक्षेमध्ये अनुशेषाने विषय पूर्णतः उत्तीर्ण होऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय/ चतुर्थ वर्षामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतील, अशाच विद्यार्थ्यांना पुढील सत्रासाठी प्रवेश सुरू ठेवता येईल.

 

सत्र पाचवे व सहावे /सातवे व आठवे या करिता सत्र समाप्तीच्या लेखी परीक्षा संबंधित विद्यार्थ्यांना एकत्रित अर्थात उन्हाळी २०२४ च्या परीक्षांमध्ये देता येतील. विशेष परीक्षेची संधी घेऊन तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचे अनुशेष पूर्ण केले नाहीत तर प्रचलित नियमानुसार तृतीय व चतुर्थ वर्षाच्या पाचव्या सातव्या सातारा करता संबंधित विद्यार्थी अपात्र ठरतील, अशा विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश हा आपोआप रद्द होईल. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे जमा केलेले शैक्षणिक शुल्क व इतर बाबी यांचा परतावा देय राहणार नाही, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j