मोठी बातमी : राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा, १०८ जणांची नावे पाहा एका क्लिकवर

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्यातील १०८ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून राष्ट्रीय शिक्षक दिनी मुंबई पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मोठी बातमी : राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा, १०८ जणांची नावे पाहा एका क्लिकवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारकडून (Maharashtra Government) देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची (Savitribai Phule State Teachers Award) घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्यातील १०८ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून राष्ट्रीय शिक्षक दिनी (National Teachers Day) मुंबईत (Mumbai) पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

 समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहे.

NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा

सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली होती. या बैठकीत पुरस्कारांसाठी शिक्षकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एकूण १०८ शिक्षकांपैकी सर्वाधिक ३९ शिक्षक माध्यमिक शाळेतील आहेत.

(पुररस्कार प्राप्त शिक्षकांची संपूर्ण यादी खाली दिली आहे)

 प्राथमिक शाळेतील ३७, आदिवासी क्षेत्रात उत्तृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) १९ तर थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ शिक्षिकांना जाहीर झाला आहे. कला व क्रीडा शिक्षकांना प्रत्येकी एक, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील एक शिक्षक आणि स्काऊट व गाईडसाठी प्रत्येक एक पुरस्कार असे एकूण १०८ पुरस्कार दिले जाणार आहेत.

 

पुररस्कार प्राप्त शिक्षकांची संपूर्ण यादी पाहा...