वडिलांच्या मृत्यूचे कारण लिहित विद्यार्थीनीची शिक्षकांकडे उत्तीर्ण करण्याची विनंती

एका विद्यार्थ्यीनीने पेपरमध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे तिला अभ्यास करता आला नाही. तसेच तिची प्रकृती बरी नसताना ती परीक्षा देण्यासाठी आली होती, असे लिहिले आहे.

वडिलांच्या मृत्यूचे कारण लिहित विद्यार्थीनीची शिक्षकांकडे उत्तीर्ण करण्याची विनंती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या देशभरातील सर्व राज्यांमध्ये 10 वी, 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत, तर काही ठिकाणी परीक्षा संपून (The exam is over) उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरु (checking the answer sheet has started) आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांनी हास्यास्पद उत्तरे लिहिली आहेत तर काही विद्यार्थ्यांनी वडिलांचा झालेला मृत्यू, अपघाताने डोक्याला झालेली दुखापत, अशी करणे सांगत परीक्षेत पास करण्याची विनवणी विद्यार्थ्यांनी केली आहे. बिहार शिक्षण मंडळाच्या (Bihar Board of Education) अशाच काही उत्तरपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत आहेत. 

बिहार बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. आता राज्यात विद्यार्थ्यांच्या उत्तरप्रत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. उत्तर पत्रिका तपासणीदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका विद्यार्थ्यीनीने शिक्षकाला त्याला पास करण्याची विनंती केली आहे. तिने पेपरमध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे तिला अभ्यास करता आला नाही. तसेच तिची प्रकृती बरी नसताना ती परीक्षा देण्यासाठी आली होती, असे लिहित विद्यार्थिनीने शिक्षकांना पास करण्याची विनंती केली आहे. 

तर विज्ञान परीक्षेतील विद्युत प्रवाहाच्या प्रश्नाचे उत्तर देताना  विद्यार्थ्याने प्रेमाचे शब्द लिहिले आहेत. परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न होता की, ओमिक आणि नॉन-ओमिक घटक काय आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थ्याने लिहिले की, आपल्याला माहित आहे की प्रेम लवकर होत नाही. पण जेव्हा ते घडते तेव्हा ते खूप दृढ असते, म्हणून त्याला अन-ओमिक म्हणतात. याशिवाय विद्यार्थ्याने लिहिले की, जो कोणी माझी कॉपी करेल, कृपया मला चांगले गुण द्या. यामुळे मी अधिक धैर्यवान मुलगी बनेन. डोक्याला दुखापत झाल्यामुळे मला नीट अभ्यास करता आला नाही. अशा प्रकारच्या उत्तरपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.