Twitter War : सरळसेवा भरतीतील पेपरफुटीविरोधी कायद्यासाठी उद्या ‘ट्विटर वॉर’

समितीने भरती परीक्षांतील विविध गैरप्रकार समोर आणले आहेत. तसेच आगामी तलाठी भरतीच्या परीक्षेतही असे प्रकार होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे.

Twitter War : सरळसेवा भरतीतील पेपरफुटीविरोधी कायद्यासाठी उद्या ‘ट्विटर वॉर’
Twitter War

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही महिन्यांत सरळसेवा भरती (Recruitment) परीक्षांमधील पेपरफुटीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परीक्षा केंद्रच (Exam Centres) परीक्षार्थींना मदत करत असल्याचे समोर आले. या प्रकरणात काही जणांना अटकही झाली. पण राज्यात पेपर फोडणाऱ्या टोळ्या सक्रीय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याविरोधात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मैदानात उतरली असून उद्या पेपरफुटीविरोधातील कठोर कायद्यासाठी ‘ट्विटर वॉर’ (Twitter War) आंदोलनाची घोषणा केली आहे.

समितीने भरती परीक्षांतील विविध गैरप्रकार समोर आणले आहेत. तसेच आगामी तलाठी भरतीच्या परीक्षेतही असे प्रकार होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. सरळसेवा नोकर भरतीत काही टोळ्या वारंवार पेपर फोडत आहे, येणारी नोकर भरती कदाचित शेवटची असेल. इतक्या प्रमाणात नोकर भरती पुन्हा होईल किंवा नाही याची शास्वती नाही. तलाठी तसेच इतर परीक्षांचे पेपर फक्त TCS च्या अधिकृत ION परीक्षा केंद्रांवर घेतले गेल्यास या घोटाळ्यांना काही प्रमाणात आळा बसेल, असे समितीने म्हटले आहे.

सीमाभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय; भरतीत मिळेना स्थान, आपल्याच निर्णयाचा सरकारला विसर

कठोर कायदा नसल्याने आरोपी लगेच तुरुंगाबाहेर येतात, म्हणून पेपर फोडी करणाऱ्यांना किमान दहा वर्षाची शिक्षा आणि हा पेपर विकत घेणाऱ्या उमेदवारांना किमान पाच वर्षाचा तुरुंगवास असलेला नवीन कायदा शासनाने करावा, या मागणीसाठी ट्विटर वॉर आंदोलन होणार असून त्यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.

मंगळवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत ट्विटरवर # परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION, # पेपरफुटीवरकायदाकरा हे दोन हॅशटॅक वापरून आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, समन्वय समितीने सातत्याने भरती परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे. तलाठी भरतीसाठीही टीसीएसच्या अधिकृत केंद्रांमध्ये परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. खासगी केंद्र दिल्यास ती मॅनेज होतात. तिथेच मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही आढळून आल्याची तक्रार समितीने यापूर्वीच केलेली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD