मुंबई, पुण्यासह राज्यातील ६६ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता

भरतीपुर्वी अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापकांची रिक्त पदांवर तातडीने समायोजित करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील ६६ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता
Assistant Professor Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अकृषी विद्यापीठाशी (Universities in Maharashtra) संलग्न अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांच्या भरतीबाबत (Assistant Professor Recruitment) आनंदाची बातमी आहे. राज्यातील ६६ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची ४५१ पदे भरण्यास राज्य शासनाने (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक २९ महाविद्यालये मुंबईतील (Mumbai) तर १० महाविद्यालये पुण्यातील (Pune) आहे. उच्च शिक्षण विभागाने (Education Department) याबाबत शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. सर्व महाविद्यालयांची यादीही त्यासोबत जोडण्यात आलेली आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने भरतीबाबतचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार २ हजार ८८ पदांपैकी उर्वरित पदे स्वायत्त महाविद्यालयांना वाटप करायची असल्याच प्रत्येक महाविद्यालयास ७१.२० टक्के भरता येतील. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयात स्वायत्त दर्जा प्राप्त असणारी एकूण ८४ महाविद्यालये आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा बोगस नोकर भरती?

त्यापैकी १८ महाविद्यालयांमध्ये ७१.२० टक्के पदे भरलेली आहेत. उर्वरित ६६ महाविद्यालयांना दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या विद्यार्थी संख्येवर आधारित अनुज्ञेय पदांच्या मर्यादेत २०८८ पैकी शिल्लक असलेल्या पदांचे वाटप समप्रमाणात म्हणजे प्रत्येक महाविद्यालयातील ७१.२० टक्के भरले जातील या पध्दतीने करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ४५१ पदांचे वाटप करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे जीआरमध्ये म्हटले आहे.

भरतीपुर्वी अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापकांची रिक्त पदांवर तातडीने समायोजित करण्यात यावे. संबंधित विषयासाठी ही पदे अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यानंतरच पदभरतीची जाहिरात देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पदांना आरक्षणाचे नियम लागू राहणार आहेत. कोणत्या विषयाची पदे प्रथम भरावीत, हा निर्णय संबंधित महाविद्यालयाचा असेल, त्याव्यतिरिक्त पदांवरील पदभरती केल्यास अशा उमेदवारांच्या वेतनाची जबाबदारी ही संबंधित संस्थेची असेल. आकृतीबंध अंतिम झालेला नसल्याने, आकृतीबंधास वित्त विभागाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत ही पदे अंतिम समजण्यात येऊ नयेत, असेही नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूंचे नाव ठेवले गुलदस्त्यात ; व्यवस्थापन परिषदेत निर्णय नाही

सर्वाधिक २९ महाविद्यालये मुंबईत

पुणे जिल्ह्यातील १० महाविद्यालयांमध्ये पदभरती होणार असून त्यामध्ये सर्वाधिक १२ पदे नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील आहेत. तर पुणे शहरातील फर्ग्यूसन, सप, गरवारे वाणिज्य महाविद्यालय आणि बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्रत्येकी पाच पदांचा समावेश आहे. सिम्बायोसिस आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातही प्रत्येकी नऊ पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे अमरावती विभागातील दोन, जळगावमधील दोन, कोल्हापूर विभागातील सात, मुंबईतील २९, नागपूर विभागातील दोन, नांदेडमधील एक, पनवेलमधील सात आणि सोलापूरातील तीन महाविद्यालयांमध्येही पदभरती होणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD