NEET-UG 2024 : मास्टरमाइंडकडून गुन्हा कबूल ; 30-32 लाखांना प्रश्नपत्रिकेची विक्री

अमित आनंदने पेपर लीकचा कट रचल्याची कबुली दिली आहे. फुटलेला पेपर आणि उत्तरे 30 ते 32 लाख रुपये किमतीत उमेदवारांना पुरविण्यात आल्याचेही समोर आले आहे.

NEET-UG 2024 : मास्टरमाइंडकडून गुन्हा कबूल ; 30-32 लाखांना प्रश्नपत्रिकेची विक्री

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


NEET-UG 2024 परीक्षेत गैरप्रकार घडल्याच्या बातमीला अखेर दुजोरा मिळाला आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड अमित आनंद (Mastermind Amit Anand)याने अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे (neet exam paper leaked)स्पष्ट झाले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमित आनंदने पेपर लीकचा कट रचल्याची कबुली दिली आहे. फुटलेला पेपर आणि उत्तरे 30 ते 32 लाख रुपये किमतीत उमेदवारांना पुरविण्यात आल्याचेही समोर आले आहे. अमित आनंदच्या कबुलीनंतर त्याच्या निवासस्थानी सापडलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे जळालेले अवशेष त्याच्याविरोधात सबळ पुरावे बनले आहेत. परीक्षा पद्धतीत भ्रष्टाचार झाल्याची कबुलीही त्याने दिली असून यापूर्वीही अशाच प्रकारे लीकमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

NEET प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी अनुराग यादव, नितीश कुमार, अमित आनंद हे तीन एनईईटी उमेदवार आहेत.  तर चौथा सिकंदर यादवंदू दानापूर नगरपरिषदेचा कनिष्ठ अभियंता  आहे. परीक्षेच्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिका आणि उत्तरे मिळाल्याचे चार आरोपींनी कबूल केले आहे.  पोलिसांना दिलेल्या जबाबात  त्यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी परीक्षेत नेमके प्रश्न विचारण्यात आले होते.
 दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने NEET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवला आहे. या खुलाशामुळे NEET उमेदवारांमध्ये आणखी संताप पसरला असून देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे.