CUET-UG परीक्षेला काही तास शिल्लक;  NTA ने या शहरात केली परीक्षा रद्द 

CUET-UG परीक्षेला काही तास शिल्लक;  NTA ने या शहरात केली परीक्षा रद्द 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET-UG) परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असताना शेवटच्या क्षणात धक्कादायक निर्णय घेतला आहे. आज 15 मे पासून देशभरात ही परीक्षा सुरु होणार होती, पण NTA ने 15 मे रोजी दिल्ली केंद्रावर होणारी CUET-UG परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

दिल्लीत ही परीक्षा आता २९ मे रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारांना सुधारित प्रवेशपत्रे दिली जातील.NTA ने एका निवेदनात म्हटले आहे की, "सर्व संबंधित उमेदवारांना सूचित केले जात आहे की चाचणीचे पेपर (रसायन- 306, जीवशास्त्र- 304, इंग्रजी- 101 आणि सामान्य चाचणी 105) फक्त दिल्लीतील केंद्रांवर उपस्थित असलेल्या उमेदवारांसाठी अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे.  ही परीक्षा 15 मे 2024 रोजी होणार होती."

15 मे रोजी होणारी परीक्षा गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद आणि नोएडा यासह देशभरातील सर्व शहरांमध्ये घेतली जाईल. NTA ने सांगितले की इतर तारखांना (मे 16, 17 आणि 18) नियोजित परीक्षा दिल्लीसह सर्व केंद्रांवर वेळापत्रकानुसार आयोजित केल्या जातील.

यापूर्वी, NTA ने Exams.nta.ac.in/CUET-UG येथे 15 ते 18 मे दरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी CUET प्रवेश डाउनलोड थेट लिंक सक्रिय केली होती. CUET UG 2024 ची परीक्षा भारताबाहेरील 26 शहरांसह 380 शहरांमध्ये घेतली जाईल. यावर्षी एकूण 261 विद्यापीठे प्रवेशासाठी CUET UG 2024 स्कोअर स्वीकारतील. CUET UG 2024 मध्ये 63 चाचणी पेपर असतील. विशिष्ट विषयांच्या पेपरचा कालावधी आणि सामान्य परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे असेल, तर उर्वरित पेपरसाठी 45 मिनिटे असेल.