AIMA : MAT EXAM : मॅनेजमेंट अप्टिट्यूड टेस्ट फेब्रुवारी २०२४ मध्ये ; तारखा झाल्या जाहीर

एमबीएअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी मॅनेजमेंट अप्टिट्यूड टेस्ट फेब्रुवारी २०२४ मध्ये  घेण्यात येणार आहे.

AIMA :  MAT EXAM : मॅनेजमेंट अप्टिट्यूड टेस्ट फेब्रुवारी २०२४ मध्ये ; तारखा झाल्या जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे (AIMA) देशभरातील सुमारे ६००  मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (Institute of Management)मधील एमबीए (MBA- MAT)अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी मॅनेजमेंट अप्टिट्यूड टेस्ट (MAT)फेब्रुवारी २०२४ मध्ये  घेण्यात येणार आहे. परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना पेपर बेस्ट टेस्ट परीक्षेसाठी येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर 22 फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

पेपर बेस्ट टेस्ट, प्रॉक्टर्ड टेस्ट आणि कम्प्युटर बेस्ट टेस्ट साठीचे स्वतंत्र वेळापत्रक ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी mat.aima.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात. परीक्षा सुरू २१०० रुपये असून दोन वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार आहे.

नोंदणी कशी करायची 

* सर्वप्रथम AIMA MAT च्या अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर जा.
* मुख्यपृष्ठावर, 'MAT फेब्रुवारी 2024' नोंदणी लिंकवर क्लिक करा.
* एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे आवश्यक तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा.
* क्रेडेन्शियल्सच्या मदतीने लॉग इन करा आणि अर्ज भरा.
* आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी जमा करा.
* अर्जाचा प्रिंटआउट घ्या आणि तो तुमच्याकडे ठेवा.