नवे शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील बदल टप्प्या-टप्प्याने दिसतील : नेहा बेलसरे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था पुणे आणि अक्षर पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘लीडर्स लीप समिट २०२३’ या परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.

नवे शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील बदल टप्प्या-टप्प्याने दिसतील  : नेहा बेलसरे यांचे प्रतिपादन
Leaders Leap Summit 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ऱाष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे काही जादूची कांडी नाही. त्याची अंमलबजावणी होऊन लगेच परिणाम दिसून येणार नाहीत. आपल्याला ते धोरण व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या धोरणातील तरतुदी सगळ्यांनी व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे (Dr. Neha Belsare) यांनी केले. (National Education Policy)

शैक्षणिक धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था पुणे (Maharashtra Rajya Shikshan Sanstha Pune) आणि अक्षर पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘लीडर्स लीप समिट २०२३’ (Leaders Leap Summit 2023) या परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या परिषदेत डॉ. बेलसरे यांच्यासह सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संघटनेच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी, आयोजक गुरुचरणसिंह संधू आदी उपस्थित होते.दरम्यान, विनय सहस्त्रबुध्दे यांनी ऑनलाईन पध्दतीने परिषदेत सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

'नासा ट्रेनिंग प्रोग्राम' निवडीसाठी २० ऑगस्टला परीक्षा; सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांना संधी

नेहा बेलसरे यांनी परिषदेत अगदी मुद्देसूदपणे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात ज्यांचा सहभाग आहे, त्यांनी हे धोरण सुरुवातीला व्यवस्थित वाचून समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या काळापासून परीक्षा पद्धती समाधानकारक राहिलेली नाही. आजही परिक्षा पद्धती, मूल्यमापन पद्धती समाधानकाराक नाहीत. ती आपल्याला बदलायची आहे. भारताची शिक्षणव्यवस्था खूप मोठी आहे. देशात १४ लाखापेक्षा शाळा ९६ लाखापेक्षा अधिक शिक्षक आणि ३३ कोटी पेक्षा जास्त मुले शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे एकटे शासन या व्यवस्थेत बदल करू शकत नाही, तर पालकांसह समाजातील इतर घटकांनाही त्यात सहभागी करून घ्यावे लागेल.

केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे, यालाच आजपर्यंत शिक्षण समजले जात होते. मात्र नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला त्यापलीकडे घेऊन जाणारे आहे. समाजात कसे वागायचे, तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा असे सगळे काही मुलांना शाळेत शिकवले गेले पाहिजे. पालक आणि शिक्षक यांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलांना ज्या गोष्टी करण्यात रस आहे ते करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. गुणांच्या मागे धावण्याची सवय मोडायला हवी, असे बेलसरे यांनी नमूद केले.

शैलजा दराडेंना भोवले ‘हे’ प्रकरण! सूरज मांढरे यांच्या अहवालानंतरच निलंबन

शाळा हे संधीचे केंद्र झाले पाहिजे. डान्स, शिल्पकला, नाटक, विज्ञानाचे प्रयोग कार्यांसाठी मुलांना संधी दिली गेली पाहिजे. मुलांना जास्तीत जास्त भाषा शिकवल्या गेल्या पाहिजे. ग्रुप मध्ये ऍक्टिव्हिटी  घेणयावर भर दिला पाहिजे. आजवरच्या शिक्षणपद्धतीने मुलांचा जाणूनबुजून निसर्गाशी असलेला संबंध तोडला आहे. तो पुन्हा जोडला गेला पाहिजे. दिवसभर मुलांना खोलीत ठेऊन शिक्षण दिले जाऊ शकत नाही. त्यांना वर्गाच्या बाहेर देखील घेऊन गेले पाहिजे, अशा विविध विषयांवर डॉ. नेहा बेलसरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

--------------------

"भारतीय मूल्यांचे अधिष्ठान असणारी तसेच जागतिक आव्हाने पेलण्यास समर्थ अशी पुढची पिढी घडावी अशी या धोरणाची दूरदृष्टी आहे. त्यानुसार शाळा या वैविध्यपूर्ण अनुभव देणारी संधींची केंद्र झाल्या पाहिजेत. विद्यार्थी स्वयंध्यनार्थी होतील, असे अनुकूल वातावरण शिक्षकांनी शिकण्यासाठी तयार केले पाहिजे. विद्यार्थी स्वतंत्रपाने विचार करणारे व्यक्ती घडावेत यासाठी उच्चस्तर मानसिक क्रियांना चालना देणारे अध्ययन अनुभव शिक्षकांनी योजावेत. "

- डॉ. नेहा बेलसरे, उपसंचालिका , महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD