JEE Advanced परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखेत बदल 

JEE Advanced साठी नोंदणी आणि अर्ज 27 एप्रिल ते 7 मे 2024 दरम्यान करता येतील. IIT JEE Advanced साठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना jeeadv.ac.in ला भेट द्यावी लागेल.

JEE Advanced परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखेत बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने संयुक्त प्रवेश परीक्षा  (JEE Advanced ) साठी  अर्ज करण्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे.  यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, नोंदणीसह अर्ज प्रक्रिया 21 एप्रिल रोजी सुरू होणार होती, जी 30 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणार होती. IIT मद्रासने (IIT Madras)नोंदणी सुरू करण्याची तारीख थोडीशी वाढवली आहे. सुधारित तारखांनुसार, JEE Advanced साठी नोंदणी आणि अर्ज 27 एप्रिल ते 7 मे 2024 दरम्यान करता येतील. IIT JEE Advanced साठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना jeeadv.ac.in ला भेट द्यावी लागेल.

IIT मद्रासने नुकतीच माहिती दिली होती की,  लोकसभा निवडणुकीचा JEE Advanced वर कोणताही परिणाम होणार नाही आणि परीक्षा आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाईल. रविवार, 26 मे रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. परीक्षेचे दोन पेपर आहेत - पेपर 1 पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 आणि पेपर 2 दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत घेण्यात येईल.
JEE Advanced परीक्षेचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 मे (सायंकाळी 5) आहे. 17 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रवेशपत्र जारी केले जाईल. 31 मे रोजी परीक्षा पोर्टलवर उमेदवारांच्या उत्तरांच्या प्रती प्रदर्शित केल्या जातील आणि तात्पुरती उत्तर की 2 जून रोजी प्रसिद्ध केली जाईल.

उमेदवार 2 जून रोजी सकाळी 10 ते 3 जून रोजी संध्याकाळी 5 या वेळेत प्रोव्हिजनल कीवर त्यांचा अभिप्राय आणि टिप्पण्या पाठवू शकतात. JEE Advanced 2024 चा निकाल आणि अंतिम उत्तर की 9 जून रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर, जॉइंट सीट ऍलोकेशन (JoSAA) आणि आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट (AAT 2024) द्वारे IIT समुपदेशनासाठी नोंदणी सुरू होईल.