झेड.पी.ज्युनिअर सिव्हिल इंजिनीअर पदाच्या परीक्षेची वेळ अतार्किक ? ; रोहित पवारांकडून पत्र सोशल मिडियावर पोस्ट 

विद्यार्थ्यांनी मागीतलेल्या परीक्षा केंद्राएवजी त्यांना  ३०० ते ४०० किमी अंतरावरील परीक्षा केंद्र दिले आहे.त्यातही सकाळी ७ ते ७.४५ या कालावधीत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परंतु, सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मुकामी जाऊन थांबावे लागणार आहे.

झेड.पी.ज्युनिअर सिव्हिल इंजिनीअर पदाच्या परीक्षेची वेळ अतार्किक  ? ; रोहित पवारांकडून पत्र सोशल मिडियावर  पोस्ट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जिल्हा परिषदेच्या ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर पदाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घरापासून ३०० ते ४०० किमी अंतरावरील परीक्षा देण्यात आले असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर सकाळी ७ वाजता बोलावले आहे.मात्र,परीक्षेसाठी भरमसाठ शुल्क आकारून अशा प्रकारे परीक्षेची व्यवस्था करणे हे अतार्किक असून विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेत बदल करावा.तसेच त्यांना त्यांच्या घराजवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी अभियंता सेलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.तसेच आमदार रोहित पवार यांनी हे पत्र सोशाल मिडीयावर पोस्ट केले आहे.

हेही वाचा : SPPU News : विद्यार्थी संघटनांचा वाद पोलीस आयुक्तांच्या दरबारी; नियमावली तयार करणार?

जिल्हा परिषदेच्या  ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) पदाच्या परीक्षेसाठी येत्या १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील विविध शहरांमधील केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.मात्र,विद्यार्थ्यांनी मागीतलेल्या परीक्षा केंद्राएवजी त्यांना  ३०० ते ४०० किमी अंतरावरील परीक्षा केंद्र दिले आहे.त्यातही सकाळी ७ ते ७.४५ या कालावधीत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परंतु, सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मुकामी जाऊन थांबावे लागणार आहे.त्यामुळे त्यांचा खर्च वाढणार आहे. ही बाब विचारात घेऊन परीक्षेच्या वेळेत बदल करावा,अशी मागणी राष्ट्रवादी अभियंता सेलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

सांगलीच्या विद्यार्थ्याला मुंबई आणि जळगावच्या विद्यार्थ्याला लातूर असे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तीन पर्याय दिले होते.त्यामुळे त्यांना त्या पैकी एक परीक्षा देणे अपेक्षित होते.परीक्षेसाठी १ हजार ते ९०० रुपये आकारून विद्यार्थ्यांची असुविधा का केली जात आहे.सकाळी परीक्षा केंद्रांवर पोहचू न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे सकाळी ९ वाजता परीक्षा घ्यावी,असे निवेदन राष्ट्रवादी अभियंता सेलने सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे.
----------------------