विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

सध्या लोकसभा आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे विविध पदांच्या मुलाखती घेणे शक्य होत नसल्याने पूर्णवेळ कुलसचिव पदाची निवड प्रक्रिया रखडली आहे, असे विद्यापीठातील काही अधिकारी सांगत आहेत.

विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
Savitribai Phule Pune University building

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)कुलसचिव पदासाठी (post of Registrar)विद्यापीठ प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले होते. विद्यापीठ प्रशासनाने अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. 36 उमेदवारांपैकी सात उमेदवार अपात्र असल्याचे यादीमध्ये स्पष्ट करण्यात आले असून त्यावरील आक्षेप येत्या 24 मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे (Director of International Center Dr.vijay khare)यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. विद्यापीठाकडे कुलसचिव पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे. सध्या लोकसभा आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे विविध पदांच्या मुलाखती घेणे शक्य होत नसल्याने पूर्णवेळ कुलसचिव पदाची निवड प्रक्रिया रखडली आहे, असे विद्यापीठातील काही अधिकारी सांगत आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुलसचिव पदाच्या मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळेच विद्यापीठाने आता कुलसचिव निवड प्रक्रिया संदर्भात वेग घेतला असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्ष भारांपासून विद्यापीठाला पूर्णवेळ अधिष्ठाता नाहीत.तसेच विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज प्रभारी कुलगुरू यांच्या मार्फत केले जात आहे.त्यामुळे विद्यापीठाकडून पूर्णवेळ कुलसचिव व अधिष्ठाता यांची नियुक्ती केव्हा केली जाणार ? असा सवाल विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.अखेर पात्र मुळाखातीस उमेदवारांची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.तसेच  नवउपक्रम व नव संशोधन सहाचार्य मंडळ संचालक पदासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सुध्दा विद्यापीठाने प्रसिध्द केली आहे.