NEET UG नंतर आता CUET UG चे पेपर लिक ? ; पेपर लिक झालाच नाही,  NTA चा दावा 

गुरुवारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप झाला होता. मात्र, चाचणी एजन्सीने प्रश्नपत्रिकांचे चुकीचे वितरण झाल्याचे स्पष्ट केले आहे.

NEET UG नंतर आता CUET UG चे पेपर लिक ? ; पेपर लिक झालाच नाही,  NTA चा दावा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET UG चा पेपर लिक प्रकरणावरून देशभरात मोठा वादंग सुरु असताना आता CUET UG चा ही पेपर लिक (paper leak) झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र,नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पेपर लिक झाला नसल्याचा दावा केला आहे.

गुरुवारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप झाला होता. मात्र, चाचणी एजन्सीने प्रश्नपत्रिकांचे चुकीचे वितरण झाल्याचे स्पष्ट केले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार NTA च्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, " कानपूर केंद्रावर हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चुकून इंग्रजीची प्रश्नपत्रिका  देण्यात आली. एकही पेपर फुटला नाही. पण यामुळे 220 हून अधिक विद्यार्थ्यांची अडचण झाली. या बाधित विद्यार्थ्यांची 29 मे रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे."

दरम्यान दिल्लीतील केंद्रावर 15 मे रोजी होणारी  CUET UG परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.  आता NTA ही परीक्षा 29 मे रोजी दिल्लीच्या परीक्षा केंद्रांवर आयोजित करेल. CUET UG परीक्षा परीक्षेच्या पहिल्या दिवशी 75% आणि दुसऱ्या दिवशी 79% उपस्थिती होती.

दरम्यान, असाच एक प्रकार नुकताच समोर आला होता. राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा अंडरग्रेजुएट परीक्षेमध्ये (NEET UG परीक्षा)  राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील परीक्षा केंद्रावर हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती.