अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा श्रेयांक आराखडा प्रसिध्द; यंदापासूनच होणार अंमलबजावणी

दिनांक २३ जून २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा श्रेयांक आराखडा प्रसिध्द; यंदापासूनच होणार अंमलबजावणी
Engineering Degree Credit Framework

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम (Engineering Degree) आराखडा, श्रेयांक आराखडा (Credit Framework) याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून (Higher and Technical Education Department) मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या आराखड्याची अंमलबजाणी राज्यात दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात चालू शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालयांमध्ये हा निर्णय़ लागू केला जाणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, दिनांक २३ जून २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रामध्ये साधक बाधक चर्चा होऊन अभियांत्रिकी स्वायत्त संस्थांमधील अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्याची राज्यामध्ये एकसमान प्रमाणात अंमलबजावणी होण्यासाठी सर्व (अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे व समुह विद्यापीठे आणि सर्व शैक्षणिक संस्था यामधील) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी सूचना व निर्देश जारी करण्याचे प्रस्तावित होते.

उत्तरपत्रिका तपासण्यास विद्यापीठाकडून उशीर का होतोय? गंभीर माहिती आली समोर

त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पहिल्या टप्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या स्वायत्त संस्थांमधील (Autonomous Institutes) पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्या संदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात यावी, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच सर्व अकृषि विद्यापीठांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमासाठी या धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून करण्यात यावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. श्रेयांक आराखड्यानुसार विद्यार्थ्यांना मल्टीपल एंट्री आणि मल्टीपल एक्झिटचा पर्याय असणार आहे.

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

चार वर्षांच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या एका वर्षाच्या प्रमाणपत्रासाठी कमीत कमी ४० व जास्तीत जास्त ४४ श्रेयांक निश्चित करण्यात आले आहेत. तर दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ८० व ८८ आणि तीन वर्षांच्या बी.व्होक किंवा बीएससी पदवीसाठी १२० व १३२ श्रेयांक मिळवावे लागणार आहेत. चार वर्षांच्या पदवीसाठी (मल्टीडिसिप्लिनरी मायनर) किमान १४० ते कमाल १७६ आणि ऑनर्स व मल्टीडिसिप्लिनरी मायनरसाठी १८० व १९४ श्रेयांक आवश्यक असतील. प्रत्येक सत्रासाठी किमान २० आणि कमाल २२ श्रेयांक आवश्यक असतील.  

श्रेयांक आराखड्याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा - https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202307041749190408.pdf

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD