UPSC टॉपर ठरतीये फसवणुकीची शिकार; देशात तिसरी आलेली डोनुरु अनन्या रेड्डी

फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या नावाने बनावट खाती चालवली जात आहेत.

UPSC टॉपर ठरतीये फसवणुकीची शिकार; देशात तिसरी आलेली डोनुरु अनन्या रेड्डी
Donuru Ananya Reddy

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UPSC CSE 2024 परीक्षेत देशात तिसरी आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारी डोनुरु अनन्या रेड्डी (IAS ) सध्या वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. डोनुरु अनन्या रेड्डी (Donuru Ananya Reddy)ही महबूबनगर, तेलंगणा येथील रहिवासी असून सोशल प्लॅटफॉर्मवर तिच्या नावाचा गैरवापर होत असल्याचा आरोप डोनुरु अनन्या रेड्डी हिने केला आहे. रेड्डी हिने याविषयी सायबर सेलकडे तक्रार (Complaint to Cyber ​​Cell)केली आहे.

सायबर सेल कडे  केलेल्या तक्रारीत  तीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या नावाने बनावट खाती चालवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. या खात्यांच्या माध्यमातून तिच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा तीने केला आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार डोनुरु अनन्या रेड्डी यांनी सायबर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी स्पष्ट केले आहे की, "ही बनावट खाती त्यांच्या नावावर बनावट मेंटॉरशिप प्रोग्राम ऑफर करत आहेत. या अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. लोक या फेक अकाऊंटला खऱ्या मानून फॉलो करत आहेत. अशा परिस्थितीत लोक या मेंटॉरशिप प्रोग्रामचे शुल्कही तिच्या नावावर जमा करतील,अशी भीती अनन्याला वाटते."

पोलीस या बनावट खात्यांचा माग काढत आहेत. डोनुरु अनन्या रेड्डीच्या तक्रारीवरून पोलिसांनी IPC कलम 419 (दुसऱ्याची ओळख वापरून फसवणूक करणे), कलम 420 (फसवणूक) आणि कलम 66C (IPC Acts) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे.