परीक्षा घेणाऱ्या एजन्सीलाच ‘महाज्योती’कडून डच्चू; प्रवेश परीक्षांबाबत महत्वाची अपडेट

महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी याबाबत पत्रक जारी केले आहे. महाज्योतीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संचलन करणाऱ्या यंत्रणेची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे.

परीक्षा घेणाऱ्या एजन्सीलाच ‘महाज्योती’कडून डच्चू; प्रवेश परीक्षांबाबत महत्वाची अपडेट
Mahajyoti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पुर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांबाबत महत्वाची अपडेट आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (Mahajyoti) प्रवेश परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या एजन्सीलाच डच्चू दिला आहे. दोन्ही परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता नवीन एजन्सीची नेमणूक केली जाणार असून परीक्षाही पुन्हा घेतल्या जाणार असल्याचे महाज्योतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी याबाबत पत्रक जारी केले आहे. महाज्योतीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संचलन करणाऱ्या यंत्रणेची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे. परीक्षा घेण्यासाठी नव्या यंत्रणेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात यईल. त्याची माहिती महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

NCC च्या विद्यार्थ्यांना ट्रेनरकडून अमानुष मारहाण; सोशल मीडियात ठाण्यातील व्हिडीओ व्हायरल

काय घडले होते?

महाज्योतीने यूपीएससी तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता एका परीक्षा एजन्सीद्वारे अनुक्रमे १६ जुलै व ३० जुलै रोजी राज्यभरात एकाचवेळी परीक्षा घेतली. दोन्ही परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी महाज्योतीकडे आल्या होत्या. एमपीएससीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिके तर खासगी संस्थेच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता.

गैरप्रकाराच्या तक्रारी आल्यानंतर राजेश खवले यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. परीक्षा एजन्सीकडून आलेला खुलासा व चौकशीमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट दिसून आल्याचे समजते. त्यामुळे खवले यांनी परीक्षा एजन्सीचा कार्यादेश रद्द करण्याचे आदेश काढले.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD