सिम्बायोसिस विद्यापीठात महारोजगार मेळाव्याचे आयोजन; तीन हजारांहून अधिक पदभरती

रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३ हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत.

सिम्बायोसिस विद्यापीठात महारोजगार मेळाव्याचे आयोजन; तीन हजारांहून अधिक पदभरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शासनाचा (Maharashtra Government) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (Skill Department) आणि सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या (Symbiosis Skiil and Professional University) वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे (Employment Fair) आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील सिम्बायोसिस भवन येथे होणार आहे.

 

रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३ हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांसाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर,  पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारकांना रोजगाराची संधी आहे.

विद्युत विभागात अडीच हजार जागांवर भरती; पदे, अर्ज कसा भरायचा...संपूर्ण माहिती वाचा...

 

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

 

जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO