मित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

राज रावसाहेब गर्जे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने मंगळवारी गोखलेनगर येथील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली आहे.

मित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट
Student commits suicide

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मित्राच्या त्रासाला कंटाळून विधी अभ्यासक्रमात (Law College) तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Student Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Police) घडली आहे. आत्महत्या केलेला विद्यार्थी मुळचा बीड (Beed) येथील आहे. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेली चिठ्ठी (Suicide Note) पोलिसांना सापडली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज रावसाहेब गर्जे (वय २२) (Raj Garje) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने मंगळवारी गोखलेनगर येथील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली आहे. तो डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. याप्रकरणी वडील रावसाहेब गर्जे (रा. पाटस, ता. आष्टी, जि. बीड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 'मॅट'चा दणका : शिक्षण विभागातील महसुली अधिका-यांच्या प्रतिनियुक्ती बेकायदेशीर

राज याने लिहिलेल्या चिठीमध्ये एका मित्राचे नाव लिहिले आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या त्रासामुळे राजने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

राज याने मित्रासोबत ५० हजार रुपयांचा आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केल्याची प्राथमिक माहिती आहे. मित्राकडून पैसे परत दिले जात नसल्याने राज मानसिक तणावाखाली होता. या त्रासातूनच त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2