धक्कादायक : झेडपीच्या शाळांची लागली वाट ;  ३ लाख विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरवली पाठ ? 

प्रामुख्याने नांदेड, औरंगाबाद, बीड, लातूर, जालना, यवतमाळ या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या २५ ते १५ हजारांपर्यंत कमी झाल्याचे दिसून येत आहे.पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २ हजार ९२५ विद्यार्थी कमी झाले आहेत तर पुणे महानगरपालिका शाळेतील ११ हजार ७९३ विद्यार्थी कमी झाले आहेत.

धक्कादायक : झेडपीच्या शाळांची लागली वाट ;  ३  लाख विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरवली पाठ ? 
ZP school

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये () शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (student )संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३ लाखाने घट झाल्याची धक्कादायक माहिती यु-डायस प्लसच्या (u-dias plus)आकडेवारी वरून समोर आली आहे. प्रामुख्याने नांदेड, औरंगाबाद, बीड, लातूर, जालना, यवतमाळ (Nanded, Aurangabad, Beed, Latur, Jalna, Yavatmal) या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या २५ ते १५ हजारांपर्यंत कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांची शैक्षणिक स्थिती गंभीर असल्यानेच विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या ZP schoolशाळांकडे पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शिक्षण पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शाळांना सुट्टी देण्याची मागणी

राज्याच्या समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तसेच महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांना पत्र पाठवण्यात आले. त्यात राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात ३ लाख १३ हजार ७६४ तर नगरपालिकेच्या शाळांमधील ८ हजार ७४२ विद्यार्थी कमी झाले आहेत .तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये २१ हजार ७३८ विद्यार्थीची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. परंतु, गेल्या दोन वर्षातील विद्यार्थ्यांच्या आकडेवारीचा विचार करता त्यात खूप मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केली आहे किंवा नाही याबाबत खात्री करावी, असे पत्र सहाय्यक संचालक सरोज जगताप यांनी पाठवले आहे. या पत्रामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची झालेली घट समोर आली  आहे.

राज्यातील विद्यार्थी संख्येच्या आधारे शालेय शिक्षण विभागातर्फे सर्व जिल्ह्यांना विविध योजनांसाठीचा निधी दिला जातो. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकात सुद्धा घट करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने सर्व अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची नोंद १००  टक्के पूर्ण झाली आहेत की नाही हे तपासण्यास सांगितले आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे सुद्धा आपोआप कमी होतात. त्यामुळे यापुढील काळात शिक्षक भरतीवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येऊ शकतो.

झेड.पी. शाळेतील जिल्हा निहाय घटलेली विद्यार्थी संख्या

नांदेड - २५ हजार २६७
औरंगाबाद - २३ हजार ०२४
बीड  - २१ हजार ०४७
लातूर - १७ हजार ५०८
जालना - १७ हजार २६२
यवतमाळ -१५ हजार ५६२
सोलापूर - १४ हजार ५४९
 परभणी - १३ हजार ७६२
नाशिक - १३ हजार २४७
जळगाव - ११ हजार ००९
बुलढाणा - ११ हजार ४४०
हिंगोली - १० हजार ३००
अहमदनगर - ९ हजार ९६५
उस्मानाबाद - ९ हजार ९६५
सातारा - ८ हजार ८९८
धुळे - ८ हजार ५१४
 पालघर - ७ हजार १५०
वाशिम - ६ हजार ७४४
अकोला - ६ हजार ४३९
अमरावती - ६ हजार ४०१
सांगली -  ६ हजार ०५६
चंद्रपूर - ५ हजार ६००
नंदुरबार - ४ हजार ९४८
ठाणे - ४ हजार ८१५
रत्नागिरी -  ४ हजार ६८८
---------------------------------


राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये झेडपीच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या ३ ते १ हजाराने घटली आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २ हजार ९२५ विद्यार्थी कमी झाले आहेत.  मुंबई शहरातील सरकारी शाळेमधील १४ हजार ८७१ विद्यार्थी घटले आहेत.