राज्यातील शिक्षक काळ्या फिती लावून करणार काम; शिक्षक दिनी सरकारचा निषेध

महासंघाच्या वतीने अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे व समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे.

राज्यातील शिक्षक काळ्या फिती लावून करणार काम; शिक्षक दिनी सरकारचा निषेध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन (Junior College) शिक्षकांच्या मागण्यांबाबत केवळ आश्वासने मिळत असल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राष्ट्रीय शिक्षक दिनी (National Teachers' Day) राज्यातील सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्या हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे. (Teachers Protest)

महासंघाच्या वतीने अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे व समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी महासंघाने वारंवार प्रयत्न, पाठपुरावा करूनही शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत. महासंघातर्फे अनेक वेळा भेटी घेऊन, निवेदने देऊनही आश्वासनांची पूर्तता झाली नाही, त्यामुळे राज्यातील शिक्षक प्रचंड नाराज आहेत. त्यांची फसवणूक करण्यात आली अशी भावना निर्माण झाली आहे.

शिक्षक दीन...म्हणून काळा शिक्षक दिन!

अशा स्थितीत राज्यातर्फे शिक्षक दिन साजरा करीत शिक्षकाचे खोटे कौतुक स्विकारण्याची महासंघाची मानसिकता नाही. शिक्षकांच्या समस्या सोडवीत त्यांना आनंद घेता येईल असे वातावरण आपण निर्माण करावे अशी महासंघाची आग्रही मागणी आहे. त्यामुळे या शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २०२३ रोजी काळ्या फिती लावण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावतील, असे महासंघाने म्हटले आहे. महासंघाच्या जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. विक्रम काळे, उपाध्यक्ष प्रा. बब्रुवान घोडके, सहचिटणीस प्रा. गोपीचंद करंडे, समन्वयक प्रा. राजेंद्र निकत, जिल्हा कार्यकारणी सदस्य हिम्मत तोब्रे,सुंदर लोंढे, बाळासाहेब गायकवाड, सुभाष पालवे, संतोष बिराजदार आदींनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संपत सुर्यवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

महासंघाच्या प्रमुख मागण्या -

 - १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अर्धवेळ तसेच अंशता अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.

 - १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

 - शासकीय कर्मचान्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आन्यासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी.

 - वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी व आय.टी. विषय अनुदानित करावा.

Mrunal Ganjale : मृणाल गांजाळे का ठरल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी?

- अघोषित उच्च माध्य. ला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला प्रचलित अनुदानसूत्र तातडीने लागू करावे. अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात.

 - विनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदलीला दि. १ डिसेंबर पासून लागू केलेली स्थगिती त्वरित रह करावी.

- शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत.

 - कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्यचे निकष शाळा संहितेनुसार असावेत.

- एम. फिल. एम.एड., पीएच. डी. चारक क म वि शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी.

 - उपदानाची रक्कम २० लाख करण्यात यावी व निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j