शिक्षक दीन...म्हणून काळा शिक्षक दिन!

अनेक मुद्यांवरून शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे काही संघटनांनी मंगळवारी शिक्षक दिन काळा शिक्षक दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. तानाजी नाईक यांनी हा काळा दिन म्हणून का साजरा करतोय, हे स्पष्ट केले आहे.

शिक्षक दीन...म्हणून काळा शिक्षक दिन!

राष्ट्रीय शिक्षक दिन (National Teacher's Day) देशभरात उत्साहात साजरा केला जाईल. शाळा-महाविद्यालयांसह विविध संस्था-संघटनांकडून गुरूंना वंदन करून शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला जाईल, त्यांचा सन्मान केला जाईल. पण आज देशभरातील शाळांमधील शिक्षक खरेच समाधानी आहेत का? त्यांच्यावर लादण्यात आलेली इतर कामे कमी झाली आहेत का, अशा अनेक मुद्यांवरून शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे काही संघटनांनी मंगळवारी (दि. ५) शिक्षक दिन काळा शिक्षक दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. तानाजी नाईक (Prof. Tanaji Naik) यांनी हा काळा दिन म्हणून का साजरा करतोय, हे स्पष्ट केले आहे.   

 

देशभरात सुमारे २७ कोटी विद्यार्थ्यांना एक कोटी शिक्षक बांधव विद्यादान करतात. शिक्षक दिन हा शिक्षक पदी कार्य केलेल्या व्यक्तीने राष्ट्रपती पद भूषविले हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. हे सत्यच आहे. परंतु, आजचा शिक्षक हा खरोखरच समाधानी आपण ठेवलात का? शिक्षक दिन नसून शिक्षक हा दीन आहे, याची असंख्य कारणे आहेत.

१. प्राथमिक जिल्हा परिषद व नगरपालिकेतील शाळांमध्ये आपला देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षापर्यंत अजूनही शिपाई दिला गेला नाही. ही कामे तेथील लहान बालकांच्या कडून घेतली करून घेतली जातात. म्हणून काळा शिक्षक दिन.

२. देशभरातल्या आणि राज्यातल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांचे कडून 100% पैसे घेतल्याशिवाय केल्याच जात नाहीत. त्याही वेळेत पूर्ण होत नाहीत. म्हणून काळा शिक्षक दिन.

३. मुख्याध्यापक, प्राचार्य या पदांची मंजुरी सुद्धा पैसे देऊनही वेळेत होत नाहीत. म्हणून काळा शिक्षक दिन.

४. पगार बिले मान्यतेसाठी प्रति व्यक्ती पैसे घेतले जातात. म्हणून काळा शिक्षक दिन.

शिक्षक भरती : पवित्र पोर्टलवर असा भरा अर्ज, महत्वाचे दहा मुद्दे वाचा...

५. बरेच शिक्षक तयार असताना शिक्षक भरतीच नाही. अजूनही वरिष्ठ महाविद्यालयांच्या भरती पूर्ण नाहीत. म्हणून काळा शिक्षक दिन.

६. भरतीमध्ये पोर्टलच्या निमित्ताने विनाअनुदानित वरून अनुदानित बदली अडवणे, म्हणून काळा शिक्षक दिन.

७. अजूनही काही वरिष्ठ महाविद्यालयात पंधरा ते वीस वर्षापासून भरतीच नाही. म्हणून काळा शिक्षक दिन.

८. सर्व देशातील व महाराष्ट्रातील निवृत्त शिक्षकांना पेन्शन मान्यतेसाठी ससेहोलपट केल्यानंतरच पेन्शन मंजूर तेही पैसे देऊनच, म्हणून काळा शिक्षक दिन.

९. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी असंख्य शिफारशी म्हणून, काळा शिक्षक दिन.

१०. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्व आमदार, शिक्षक सोडून सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी सर्वांना शंभर टक्के पगार, शिक्षकांना मात्र टप्पाच अनुदान. म्हणून काळा शिक्षक दिन.

११. अनुदान धोरण पूर्वी शंभर टक्के होते. नंतर ते २५ टक्के झाले. नंतर २० टक्क्यांचा टप्पा. आता पहिला टप्पा नंतरचा टप्पा सरकारची इच्छा. म्हणून काळा शिक्षक दिन.

१२. अनुदान आपणास द्यायचे आहे ना ते सरळ सरसकट द्यायचे. मात्र अनुदान प्रक्रियेमध्ये प्रचंड जाचक अटीच. म्हणून काळा शिक्षक दिन.

१३. प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांची वैद्यकिय बिले पास करण्यासाठी ठराविक टक्केवारी. ती घेऊनही वेळेत बिले पास होत नाहीत. म्हणून काळा शिक्षक दिन.

१४. आता सध्या महाराष्ट्रात शालार्थ आयडी दिला जातो. चुकीच्या व्यक्तीला पगार दिला जाणार नाही हा याचा हेतू आहे. मात्र पुणे विभागात २०-२० वर्ष काम करूनही शालार्थ न दिल्यामुळे पगार मिळत नाहीत. म्हणून काळा शिक्षक दिन.

१५. गाव, तालुका येथील शिक्षण अधिकारी ते उपसंचालक, संचालक, आयुक्त कार्यालयापर्यंत यांना काम पूर्ण वेळेत करण्याचे कोणतेही बंधन नाही. हे संस्थेवर व शिक्षकांच्यावरच ओरडतात. म्हणून काळा शिक्षक दिन.

शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना चारचाकीने उडविले; दोघांचा मृत्यू, बारामतीजवळील घटना

१६. पोर्टल धोरण असो आणि कोणतेही नवीन शैक्षणिक धोरण असो, जुने ते सोने आहेच. जुन्या शिक्षकांना विनाअनुदानित वरील असो अन्य असो यांना बदली मध्ये हक्क आहे. अजूनही बदली बंदी स्थगिती कायद्याने काढूनही आपण अंमलबजावणी करतच नाही. म्हणून काळा शिक्षक दिन.

१७. नैसर्गिक वाढ विनाअनुदान प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक बऱ्याच शाळा, कॉलेज अनुदानास पात्र होऊन संचालक आयुक्त कार्यालयांमध्येच साहेब यांना अजूनही अनुदान नाहीच. हे कधी देणार. म्हणून काळा शिक्षक दिन.

१९. लाच, डोनेशन ही तर शिक्षक व समाजातील सामान्य जनतेच्या पाचवीलाच पुजले आहे. म्हणून काळा शिक्षक दिन.

१९. राज्यभरातील सुमारे २१ लाख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हेच राज्य असो देश असो सध्या चालवतात. त्यांच्या म्हातारपणात यांना आपण पेन्शन देत नाही. म्हणून काळा शिक्षक दिन.

२०. भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे देणगी असेल तर नोकरी मग गरीब मुलाने व मुलीने शिक्षक व्हायचे नाही का. म्हणून काळा शिक्षक दिन.

२१. संपूर्ण जगभरात, देशभरात अनुदान टप्पा पद्धती आहेत. सरळ शंभर टक्के अनुदान मग महाराष्ट्रात २०-४०-६० तेही आमच्या बांधवांना आंदोलनातून मिळवावे लागतेच. म्हणून काळा शिक्षक दिन.

२२. शैक्षणिक गुणवत्ता वाढीला सन्मानच दिला जात नाही. जसे पीएचडी, अन्य पदवीप्रमाणे वेतन वाढ दिली जात नाही. म्हणून काळा शिक्षक दिन.

२३. आयटी सारख्या जगभरात महत्त्वाच्या विषयाला आपण अनुदान देण्याचे धोरण ठरवत नाही. म्हणून काळा शिक्षक दिन.

 

 बंधू आणि भगिनींनो, शिक्षण प्रेमी शिक्षक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यांना वरील समस्येतून जावंच लागलेले आहे. आपण वरीलपैकी एका जरी समस्या मध्ये असाल, आपण या अडचणीतून गेला असाल, तर हजार वेळा विचार करावा. खरोखरच शिक्षक दीन होतोय? नाही ना मग आपण साजरा करूया काळा शिक्षक दिन.

  • प्रा. तानाजी नाईक

राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती 

राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षण संघ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j