राज्यात १५० नवीन महाविद्यालये सुरू होणार; महिलांसाठी सर्वाधिक ३४... पुणे-मुंबई आघाडीवर

प्रस्तावांची तपासणी केल्यानंतर त्यांना कायम विना अनुदान तत्वावर अंतिम मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे शासन आदेश गुरूवारी जारी करण्यात आले आहेत.

राज्यात १५० नवीन महाविद्यालये सुरू होणार; महिलांसाठी सर्वाधिक ३४... पुणे-मुंबई आघाडीवर
New Colleges in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शासनाने (Maharashtra Government) येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन १४६ वरिष्ठ महाविद्यालये (Colleges in Maharashtra) सुरू करण्यास गुरूवारी मान्यता दिली आहे. ही सर्व महाविद्यालये कायम विनानुदानित तत्वावर सुरू होतील. त्यामध्ये सर्वाधिक ३४ महाविद्यालये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाशी (SNDT Women's University) संलग्न आहेत. बहुतेक महाविद्यालयांमध्ये कला (Art), वाणिज्य (Commerce) व विज्ञान (Science) विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमांना अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य शासनाकडे १४६ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांची तपासणी केल्यानंतर त्यांना कायम विना अनुदान तत्वावर अंतिम मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे शासन आदेश गुरूवारी जारी करण्यात आले आहेत.

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेेश प्रक्रियेला सुरूवात; राज्यातील ७७ महाविद्यालयांसाठी ऑनलाईन प्रक्रिया

बहुतेक महाविद्यालयांमध्ये बीए. बीकॉम व बीएसस्सी हे पारंपरिक पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तर काही महाविद्यालयांमध्ये विधी पदवी. बीएसस्सी हॉटेल मॅनेटमेंट, बीबीए, होम सायन्स आदी अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. ही महाविद्यालये कायम विनानुदान तत्वावर असल्याने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व वेतनेतर दायित्व शासनावर असणार नाही.

महाविद्यालयांनी हमीपत्र सादर केल्याशिवाय आणि तसे विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरू करू नये, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावीनंतर दोन वर्षात शिक्षक व्हायचंय, मग ऑनलाईन अर्ज भरला का? नोंदणीला झाली सुरूवात

राज्यात अंतिम मान्यता मिळालेली महाविद्यालये –

मुंबई विद्यापीठ – २४

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर – १२

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली – ५

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – २२

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – १३

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव – ८

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – १५

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – ८

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ – ३४

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर - ५

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo