शिक्षकांची कौशल्ये, ज्ञान आणि अध्यापन अद्ययावत असावे : लामचोंघोई स्वीटी चांगसन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा सोमवारी दुसरा दिवस होता.

शिक्षकांची कौशल्ये, ज्ञान आणि अध्यापन अद्ययावत असावे : लामचोंघोई स्वीटी चांगसन
G 20 Workshop

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मिश्र शिक्षण पद्धती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी आणि बदलांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी कौशल्ये (Teachers Skills), ज्ञान आणि अध्यापन शास्त्रीय दृष्टीकोनांसह अद्ययावत असणे गरजेचे आहे ,असे मत केंद्रीय शालेय शिक्षण विभागाच्या (School Education Ministry) अतिरिक्त सचिव लामचोंघोई स्वीटी चांगसन (Lamchonghoi Sweety Changsan) यांनी जी-20 (G 20) निमित्त आयोजित “मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” या विषयांवरील राष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) “मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, ‘मिश्र स्वरूपात शिक्षकांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण’ या विषयांवरील चर्चासत्रात लामचोंघोई स्वीटी चांगसन बोलत होत्या. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. सुरेश गोसावी, केंद्र आणि राज्यातील शिक्षण मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे घेऊन जाणा-या प्रदर्शनाची विद्यापीठात मेजवानी...

निष्ठा (NISHTHA) या  मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जात असलेल्या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत, 35 लाख पूर्व प्राथमिक,प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवरील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणात, शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे,असेही लामचोंघोई स्वीटी चांगसन  यांनी यावेळी सांगितले. 

सुरेश गोसावी यांनी विद्यापीठात आयोजित  मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र  प्रदर्शनाबद्दल माहिती दिली. जी-20 परिषदेच्या दुस-या दिवाशी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांचे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख’ या वरील पद्धतींविषयीचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo