HSC Result Update : निकालाबाबत अडचणी आल्यास थेट बोर्डात करा फोन; सहा दुरध्वनी क्रमांक जारी

राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आलेला निकाल काही तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना पाहता आला नसल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते.

HSC Result Update : निकालाबाबत अडचणी आल्यास थेट बोर्डात करा फोन; सहा दुरध्वनी क्रमांक जारी
HSC Result Updates

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC Board) फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. निकाल (12th Result News) पाहताना विद्यार्थी व पालकांना काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी राज्य मंडळातर्फे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (Maharashtra HSC Board Result) 

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के; यंदाही मुलींची बाजी              

राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आलेला निकाल काही तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना पाहता आला नसल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. त्यामुळे यंदा राज्य मंडळांनी काही संपर्क क्रमांक दिले आहेत. विद्यार्थी व पालक या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजल्यानंतर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. तसेच प्रिंट आऊटही काढता येईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. (HSC Result Declared)

बारावीच्या निकालात मुंबई तळात; कोकण पुन्हा अव्वल तर पुणे दुसऱ्या स्थानावर

दरम्यान, इयत्ता बारावीचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या एकूण १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या २ लाख ९० हजार २५८ ही मुंबई विभागातील आहे. विभागनिहाय निकालात मुंबई विभाग तळाला राहिला असून विभागाचा निकाल ८८.१३ टक्के राहिला. तर यंदाही दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे.

निकालाबाबत अडचणी आल्यास या क्रमांकांवर करा संपर्क :

१. ०२० - २५७०५२०९ 
२. ०२० - २५७०५२०३
३. ०२० - २५७०५२०४
४. ०२० - २५७०५२०६
५. ०२०- २५७०५२०७
६. ०२० - २५७०५१५१

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2