HSC Result Update : बारावीच्या निकालात मुंबई तळात; कोकण पुन्हा अव्वल तर पुणे दुसऱ्या स्थानावर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के आहे.

HSC Result Update : बारावीच्या निकालात मुंबई तळात; कोकण पुन्हा अव्वल तर पुणे दुसऱ्या स्थानावर
HSC Result Updates

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC Board) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC Result) यंदाही कोकण विभाग (Kokan Division) अव्वल ठरला आहे. तर मुंबई विभाग (Mumbai Division) तळाला राहिला. (Maharashtra HSC result) राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के इतका लागला आहे.

बारावीची परीक्षा दिलेल्या एकूण १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या २ लाख ९० हजार २५८ ही मुंबई विभागातील आहे. विभागनिहाय निकालात मुंबई विभाग तळाला राहिला असून विभागाचा निकाल ८८.१३ टक्के राहिला. तर यंदाही दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे. 

कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के इतका आहे. त्याखालोखाल पुणे व कोल्हापूर विभाग आहे. या विभागांचा निकाल अनुक्रमे ९३.३४ व ९३.२८ टक्के आहे. मागील वर्षी तळात असलेला लातूर विभाग यंदा सातव्या स्थानावर आहे.

इयत्ता बारावीचा विभागनिहाय निकाल :

कोकण - ९६.०१ टक्के 
पुणे - ९३.३४ टक्के 
कोल्हापूर - ९३.२८ टक्के 
अमरावती - ९२.७५ टक्के 
नागपूर - ९०.३५ टक्के
लातूर -  ९०.३७ टक्के
मुंबई - ८८.१३ टक्के
नाशिक - ९१.६६ टक्के
औरंगाबाद - ९१.८५ टक्के

अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे -

१. mahresult.nic.in

२. https://hsc.mahresults.org.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th result-2023

६. http://mh12.abpmajha.com

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2