युवकांनी संशोधन, नाविन्यतेवर भर द्यावा : समीर सोमय्या यांचे प्रतिपादन

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्यूअरशिप म्हणजेच (राइड-२३) च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

युवकांनी संशोधन, नाविन्यतेवर भर द्यावा : समीर सोमय्या यांचे प्रतिपादन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आर्थिक उलाढालीच्या जगात भारत २०३० मध्ये जगातील पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर भारतीय स्वातंत्र्य आमच्यावर उधार आहे. हे ऋण फेडण्यासाठी युवकांनी रिसर्च (Research), इनोव्हेशन (Innovation), डिझाइन अ‍ॅण्ड आंत्ररप्रेन्यूअरशिप वर अधिक भर दयावा,” असे आवाहन इंडियन मर्चंट चेंबर्सचे संचालक समीर सोमय्या (Sameer Somaiya) यांनी केले.

 


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीतर्फे (MIT World Peace University) विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्यूअरशिप म्हणजेच (राइड-२३) च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सीएसआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे व मेगा माइंडचे अविनाश आनंद गुलबजाणी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. यावेळी ६ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

SPPU News : दक्षिण कोरियातील जेजू नॅशनल विद्यापीठाशी महत्वपूर्ण करार

 

समीर सोमय्या म्हणाले, “विद्यापीठ हे संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे केंद्र आहे. भविष्यकाळ पाहता औषध निर्मितीत मोठ्या प्रमाणात संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे.” डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “आजच्या काळात युवकांनी अध्यात्मिक ज्ञान समजावून घ्यावा. या जगाला सत्य, अहिंसा आणि पंचशिलाचे तत्वच मार्ग दाखविले. स्वामी विवेकांनद यांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात  भारतमाता संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. शांतीची संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी हे विद्यापीठ कार्यरत आहे.”

 


“ उद्योजकतेसाठी एक सुंदर कल्पनेची आवश्यकता असून त्याला सत्यात उतरावे लागते. नंदन रेड्डी यांनी स्विगीची सुरूवात करून ते यशस्वी झाले. आपले तंत्रज्ञान सर्वांच्या उपयुक्त असावे. तुमची कल्पना ही संपूर्ण जग बदलणारी असावी,” असे डॉ. मांडे यांनी नमूद केले. राहुल कराड म्हणाले, “देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व रोजगार निर्मिती स्टार्टअप संस्कृती रूजविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. येथे गेल्या ५ दिवसात ७०० पेक्षा अधिक इंडस्टियलिस्टने भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील समस्यांना पारखून त्यावरील समाधान शोधावे.”


डॉ. मंगेश कराड म्हणाले, “रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन आणि आंत्रप्रेन्यूअरशीप हे २१ व्या शतकातील प्रत्येक क्षेत्रात आर्थिक उत्पत्ती करणारे आहे. अ‍ॅपल, फेसबूक, गुगल यांनी केवळ संशोधनाच्या माध्यमातून यश मिळविले आहे. पण कोडॅक, नोकिया, थॉमस कुक यांनी आधुनिक काळानुसार बदल न केल्यामुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले. संशोधनासाठी बरेच आव्हान असून विद्यार्थ्यानी ते स्विकारून प्रगती करावी.”

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k