ITI आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! शिकत असतानाच उद्योग समूहांमध्ये घ्या प्रशिक्षण

विद्यापीठाच्या B.Tech आणि BBA पदवीसह तुमचे करिअर नवीन उंचीवर घेऊन जाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

ITI आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! शिकत असतानाच उद्योग समूहांमध्ये घ्या प्रशिक्षण
Maharashtra State Skills University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि बारावी उत्तीर्ण (HSC) विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. यावर्षीपासून विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नामवंत उद्योग समूहांसह नोकरी प्रशिक्षण (OJT- On the Job Training) घेता येणार आहे. (Maharashtra State Skills University Admissions)

विद्यापीठाच्या B.Tech आणि BBA पदवीसह तुमचे करिअर नवीन उंचीवर घेऊन जाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्यातील युवक- युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

SPPU News : आदिती भोईटे ठरली यंदाची ‘गोल्ड मेडलिस्ट’; हरहुन्नरी आदितीला व्हायचंय प्राध्यापक

शिक्षण घेत असताना असताना विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये विकसित करणे आणि ज्ञान वृध्दिंगत करत असतानाच करिअरच्या अनेक वाटा खुल्या होणार आहेत. त्यादृष्टीने विद्यापीठाने अभ्यासक्रमांची रचना केली आहे. उद्योगसमूहांमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तसे प्रमाणपत्रही विद्यापीठाकडून दिले जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या कुशलतेवर शिक्कामोर्तब होणार आहे. याचा फायदा भविष्यात नोकरी मिळविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 86559 46646 आणि 86559 46654 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://mssu.ac.in/

Application Form : http://apps.mssu.ac.in/Application/Admission.aspx

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2