विद्यार्थ्यांसाठी खास गिफ्ट; पुणे मेट्रोकडून प्रवासात सवलत, दहा हजार जणांना मोफत कार्ड

पुणे मेट्रोकडून काही दिवसांपूर्वीच प्रवाशांसाठी ‘एक पुणे कार्ड’ हे बहुउद्देशीय प्रीपेड कार्ड उपलब्ध केले आहे. मेट्रो प्रवासाहबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी हे कार्ड वापरले जाऊ शकते.

विद्यार्थ्यांसाठी खास गिफ्ट; पुणे मेट्रोकडून प्रवासात सवलत, दहा हजार जणांना मोफत कार्ड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे मेट्रो (Pune Metro) प्रशासनाने पुणे (Pune) व पिंपरी चिंचवडमधील (PCMC) विद्यार्थ्यांसाठी खास गिफ्ट दिले आहे. पुणे मेट्रोतील सुखकर प्रवासाबरोबरच विद्यार्थ्यांना (Students) माफक दरातही प्रवास करता येणार आहे. त्याची सुरूवात आज (दि. ६) दुपारी एक वाजल्यापासून होणार आहे. मेट्रोकडून ‘एक पुणे विद्यार्थी पास’ (One Pune Students Pass) प्रीपेड कार्डची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्याअंतर्गत १३ वर्षे वयोगटापुढील विद्यार्थ्यांना तिकीटदरात ३० टक्के सवलत मिळणार आहे. हे कार्ड पहिल्या दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे.

 

पुणे मेट्रोकडून काही दिवसांपूर्वीच प्रवाशांसाठी ‘एक पुणे कार्ड’ हे बहुउद्देशीय प्रीपेड कार्ड उपलब्ध केले आहे. मेट्रो प्रवासाहबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी हे कार्ड वापरले जाऊ शकते. आता विद्यार्थ्यांसाठीही खास कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘एक पुणे विद्यार्थी पास’ असे या कार्डचे नाव असून ते आजपासूनच मिळणार आहे.

HSC Board Exam : इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेसाठी भरा अर्ज; मंडळाकडून तारखा जाहीर

 

पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्डचा फायदा होणार आहे. आज (दि. ६) दुपारी एक वाजल्यापासून कार्ड मिळणार असून यामध्ये पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना कार्ड मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत १५० रुपये आणि वार्षिक शुल्क ७५ रुपये असे असेल. ‘एक पुणे विद्यार्थी पास कार्ड’ घेण्यासाठी १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्याखालील वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळणार नाही.

 

कार्डसाठी १३ ते १८ वर्षे वय असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून हे कार्ड मिळू शकते. कार्डसाठी शाळा-महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाइड प्रमाणपत्र आवश्यक असेल. कार्ड घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तिकीटदरात ३० टक्के सवलत मिळेल. सर्व मेट्रो स्थानकांवर कार्ड उपलब्ध असून ई-फॉर्म भरूनही कार्ड मिळू शकते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k