महात्मा फुले अभिवादन मिरवणुकीत दहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

हात्मा फुलें, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसले होते. बग्गी, बैलगाडी, महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी झाले.

महात्मा फुले अभिवादन मिरवणुकीत दहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 पुण्यातील ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (MCES) आणि आझम कॅम्पसमधील (Azam Campus) संलग्न संस्थांच्या वतीने महात्मा फुले (Mahatma Phule) पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन मिरवणुकीत सुमारे १० हजार विद्यार्थी सहभागी झाले. ही मिरवणूक मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेसात वाजल्यापासून आझम कॅम्पस ते महात्मा फुले वाडा मार्गावर काढण्यात आली.

 

मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव इरफान शेख, शाहीद इनामदार, मशकूर शेख, साबीर शेख, सिकंदर पटेल, आसीफ शेख,वाहिद बियाबानी, गौस शेख अब्दुल वहाब, युसुफ शेख, प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी सहभागी झाले.

भावी शिक्षिकेचं काय चुकलं? केसरकरांकडून वर्षभरापुर्वी भरतीची घोषणा, अजून एकही जाहिरात नाही...

 

महात्मा फुलें, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसले होते. बग्गी, बैलगाडी, महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी झाले. विविध क्षेत्रातील यशस्वी आणि प्रेरक महिलांची वेशभुषा परिधान केलेल्या दहा विद्यार्थिनी या मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या. 

 

अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १९ वे वर्ष होते. दरवर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’( आझम कॅम्पस) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO