ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी उपकुलगुरू डॉ. मोहनराव हापसे यांचे निधन

1990 ते 1995 या कार्यकाळात डॉ. हापसे यांनी पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू म्हणून काम पाहिले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी उपकुलगुरू डॉ. मोहनराव हापसे यांचे निधन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) माजी उप कुलगुरू व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष (Former President )डॉ. मोहनराव हापसे (Ahmadnagar District Maratha Vidya Prasarak Samaj Dr. Mohanrao hapse) यांचे बुधवारी निधन झाले.ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक अशी मोहनराव हापसे यांची ओळख होती. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1938 रोजी नेवासे येथे झाला. त्यांनी नेवासे येथील ज्ञानोदय हायस्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केले तर अहमदनगर येथील अहमदनगर कॉलेजमधून पदवी अभ्यासक्रम आणि पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. रसायनशास्त्र हा त्यांचा विषय होता. नॅशनल केमिकल लायब्रोट्री येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठी ते अमेरिकेत तीन वर्ष गेले.अमेरिकेतून 1970 मध्ये परत आल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. तर प्रवारानगर येथील महाविद्यालयात 1971 मध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

डॉ. हापसे यांनी पुढे प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा समर्थपणे सांभाळली.त्यांना राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कारही प्राप्त झाला.1990 मध्ये त्यांची पुणे विद्यापीठाच्या उप कुलगुरूपदी निवड झाली.1990 ते 1995 या कार्यकाळात डॉ. हापसे यांनी पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू म्हणून काम पाहिले.17 मे 1983 रोजी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या विश्वस्त पदी त्यांची निवड करण्यात आली.1990 ते 2003 या काळात डॉ. हापसे यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.या काळात त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालये स्थापन केली.