शाळेचा पहिला दिवस; कुठे शिव चरित्राची ओळख, तर कुठे ढोल-ताशाच्या गजरात होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळांसह विद्यार्थी व पालकांनाही शाळेच्या पहिल्या दिवसाची नेहमीच उत्सुकता असते. गुरूवारपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वच शाळांमधील वातावरण भारावलेले असणार आहे.

शाळेचा पहिला दिवस; कुठे शिव चरित्राची ओळख, तर कुठे ढोल-ताशाच्या गजरात होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
Schools First Day

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळांमध्ये (Schools in Maharashtra) गुरूवारपासून चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेचा पहिला दिवस मुलांच्या कायम स्मरणात राहावा म्हणून त्यांचे जल्लोषात स्वागत करायची तयारी शाळांनी केली आहे. काही शाळांमध्ये पेढे, फुले देऊन तर काही शाळांमध्ये ढोल-ताशाच्या गजरात स्वागत होणार आहे. तर काही शाळांमध्ये शिव चरित्राची ओळख करून देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाणार आहे. (Schools in the Maharashtra will start from Thursday)

शाळांसह विद्यार्थी व पालकांनाही शाळेच्या पहिल्या दिवसाची नेहमीच उत्सुकता असते. गुरूवारपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वच शाळांमधील वातावरण भारावलेले असणार आहे. पुण्यातील शाळांनीही खास तयारी केली आहे. वर्ग सजविण्यात आले असून फुलांची आरास, रांगोळी काढली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनो, काही दिवस एकच गणवेश वापरा! सरकारकडून मिळेनात पैसे

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना 'एसपीएम इंग्लिश स्कुल'च्या मुख्याध्यपिका रमा कुलकर्णी म्हणाल्या, "यंदाचे वर्ष शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्त विद्यार्थ्यांना शिवचरित्राची ओळख व्हावी, जिजाबाईंनी बाल शिवाजींना दिलेला संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्या एक पालक सायली जोशी या जिजाबाई यांच्यावरील मोनोलॉग सादर करणार आहेत. या शिवाय आमच्या शाळेच्या बागेतील झाडे मुलांना भेट म्हणून देणार आहोत."

न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग शाळेचे मुख्याध्यापक सुनील शेवाळे म्हणाले, "शाळेच्या परंपरेनुसार उद्या ५ वी च्या विद्यार्थ्यांना वही, पुस्तकांसोबतच पाटीही देण्यात येईल. त्यांची एक वेगळी सभा घेतली जाईल. मुलांना पेढा देऊन त्यांना वर्गात पाठवले जाईल. याशिवाय खास विद्यार्थ्यांसाठी शाळेची विशेष सजावट करण्यात येणार आहे, त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात येणार आहे."

पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल.

मॉडर्न स्कुलमध्ये औक्षण करून,  गुलाबाचे फुल देऊन आणि पेढा भरवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. शाळेत सजावट करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक पांडुरंग मार्दे यांनी दिली. मॉडर्न स्कुल गणेशखिंडच्या मुख्याध्यपिका सुरेखा कामठे म्हणाल्या, " मुलांचे स्वागत ढोल-लेझीम च्या गजरात करणार आहोत. ५ वी चे तिन्ही वर्ग सजवण्यात आले आहेत. मुलांना खाऊ देऊन त्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत होणार आहे.’’

मॉडर्न हायस्कुल निगडीचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे यांनी सांगितले की, आम्ही आमच्या शाळेतील ५ वी मधील मुलांचे स्वागत वादनाने करणार आहोत. वर्गांची विशेष सजावट करण्यात आली आहे. मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेची ओळख करून देण्यात येईल. त्यांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देऊन, पेढा भरवून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo