शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी कामाला लावणार! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

शिक्षक शाळांमध्ये किती तासिका घेतात, शिकवण्यासाठी किती तयारीने येतात, अद्ययावत तंत्रज्ञान किती मिळवतात, अशा मुद्द्यांवर बोट ठेवत पाटील यांनी शिक्षकांना आरसा दाखवला.

शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी कामाला लावणार! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य
Higher Minister Chandrakant Patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या शिक्षक (Teachers') बिघडण्याच्या मार्गावर असल्याची खरमरीत टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. शिक्षक शाळांमध्ये किती तासिका घेतात, शिकवण्यासाठी किती तयारीने येतात, अद्ययावत तंत्रज्ञान किती मिळवतात, अशा मुद्द्यांवर बोट ठेवत पाटील यांनी शिक्षकांना आरसा दाखवला. तसेच अशा शिक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कामाला लावणार असल्याचेही पाटील म्हणाले.

 

भारतीय जनता पक्ष (BJP), प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (PES) आणि पुणे विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक गौरव पुरस्कार समारंभात पाटील बोलत होते. शहरातील ५०० हून अधिक शिक्षकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. संयोजक जगदीश मुळीक, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, डॉ. गजानन एकबोटे, शेखर मुंदडा, निवेदिता एकबोटे, गणेश घोष, योगेश मुळीक, शामकांत देशमुख, वर्षा डहाळे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

'त्या' महाविद्यालयाने पुन्हा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखले

 

शिक्षकांना मोदीजी कामाला लावणार असल्याचे सांगताना पाटील म्हणाले, अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन मधील शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस उद्योगांना भेट देणे पुढील वर्षापासून बंधनकारक केले जाणार आहे. वीस वर्षांपूर्वी शिकलेले तंत्रज्ञान अद्ययावत करणे त्यामुळे शक्य होणार आहे. बुद्धिमत्तेपेक्षा चांगले वागण्याला जगात महत्त्व प्राप्त झाले आहे. ऋजिता, नम्रता, प्रामाणिकपणा शिक्षणातून मिळतो. शिक्षकांनी हे गुण विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकून, अद्ययावत राहून, छोट्या छोट्या गोष्टींतून मुलांवर संस्कार केले पाहिजेत.

 

जगदीश मुळीक म्हणाले, ‘शिक्षक समर्पित भावनेने विद्यार्थी घडविण्याचे काम करीत असतात. राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे कार्य मौल्यवान आहे. समाजाने शिक्षकांना सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.’ कार्यक्रमात पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अरविंद पांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j