पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ

पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल.

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी  शिष्यवृत्ती परीक्षेत (Scholarship Exam) पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. 

उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० रुपये प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.  ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे संच एच आणि संच आय करिता २० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

‘एससी’ विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू

    पाचवीनंतर ३ वर्षांकरिता आणि आठवीनंतर २ वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते.  मात्र, गेल्या १३ वर्षात यात वाढ झाली नव्हती. त्यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असेल. सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० रुपये प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo