11th Admission : एकच दिवस उऱला! प्रथम पसंतीक्रमाचे पाच हजार विद्यार्थी अजूनही बाहेरच

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती व नाशिक या शहरांमध्ये महाविद्यालयांत प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

11th Admission : एकच दिवस उऱला! प्रथम पसंतीक्रमाचे पाच हजार विद्यार्थी अजूनही बाहेरच
11th Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता अकरावी प्रवेशाची (11th Admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून नियमित पहिल्या फेरीमधील प्रवेश घेण्यासाठी आता केवळ एकच दिवस उरला आहे. शिक्षण विभागाकडून (Education Department) पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी सुरूवातीला २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ही मुदत २६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. (11th Admission Centralised Process)

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती व नाशिक या शहरांमध्ये महाविद्यालयांत प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार २१ जूनला सकाळी दहा वाजता पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली. पुणे विभागात एकूण ८८ हजार ४१३ जागा असून त्यासाठी ६३ हजार ४४२ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यातून पहिल्या फेरीसाठी ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विज्ञान शाखेसाठी २२ हजार विद्यार्थी आहेत. तर वाणिज्य शाखेसाठी १५ हजार आणि कला शाखेसाठी ३ हजार ८०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

सीईटी सेलकडून महत्वाच्या सुचना; अभियांत्रिकी, कृषी, फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरताना घ्या काळजी...

पहिल्या पसंतीक्रमानुसार, २३ हजार ३५१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. पण त्यापैकी शनिवारपर्यंत केवळ १८ हजार ९१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. अजूनही पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही. इतर पसंतीक्रमानुसारही प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे आता एका दिवसांत एवढे प्रवेश होणार का, याबाबत शिक्षण विभागालाही उत्सुकता आहे.

दरम्यान, पहिला पसंतीक्रम मिळूनही या फेरीत प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांना दुसऱ्या नियमित फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. इतर पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी मात्र प्रवेश न घेतल्यास दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकतात. दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक सोमवारी प्रसिध्द केले जाणार आहे.

अखेर ‘कृषी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; नऊ पदवी अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश

पसंतीक्रमानुसार निवड झालेले व प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी –

      निवड झालेले - प्रवेश घेतलेले

  • २३ हजार ३५१ - १८ हजार ९१
  • ६ हजार ९७५ - २ हजार ८२९
  • ३ हजार ८९७ - १ हजार २११
  • २ हजार ४१२ - ५२६
  • १ हजार ८२३ - ३२२
  • १ हजार २९० - २०८
  • ९५० - ११२
  • ६७९ - ७३
  • ४८१ - ५३
  • ३८१ - ४९

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2