अखेर IIT मुंबईमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेबल 

IIT मुंबईच्या मेस कौन्सिल ने वसतिगृह १२, १३ आणि १४ च्या विद्यार्थ्यांना यासंदर्भात एक मेल पाठवला आहे.

अखेर IIT मुंबईमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेबल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

काही महिन्यांपूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट (IIT) मुंबईच्या कँटीन मध्ये शाकाहारी (Vegetarian) आणि मांसाहारी (Non Vegetarian) विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावर आता संस्थेने तोडगा काढत कँटीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेबल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

IIT मुंबईच्या मेस कौन्सिल ने वसतिगृह १२, १३ आणि १४ च्या विद्यार्थ्यांना यासंदर्भात एक मेल पाठवला आहे. या  ईमेलमध्ये म्हटले आहे की, "तीन वसतिगृहांच्या सामान्य कॅन्टीनमधील सहा टेबल्स "फक्त शाकाहारी जेवणासाठी" आहेत. यासोबतच या नियमाचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करून योग्य तो दंड आकारण्यात येईल." 

Times Ranking 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पुन्हा घसरण, देशातील 91 संस्थांचा समावेश

 

 दरम्यान, या वर्षी जुलैमध्ये संस्थेच्या वसतिगृह १२ च्या कॅन्टीनच्या भिंतींवर “येथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी आहे, असे पोस्टर्स लावण्यात आले होते आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने विरोध केला होता.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j