Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत दिव्यांग व अव्यंग व्यक्तींचे सर्वसमावेशक वॉकेथॉन संपन्न

वॉकेथॉनमध्ये दोनशे दिव्यांगांसोबत दोनशे अव्यंग व्यक्तींनी सहभाग घेतला.

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत दिव्यांग व अव्यंग व्यक्तींचे सर्वसमावेशक वॉकेथॉन संपन्न
Savitribai Phule Pune University Walkathon

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Pune News : पुणे येथील नॅशनल एचआरडी नेटवर्क व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) संयुक्त विद्यमाने तसेच पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, बाल कल्याण संस्था,कर्वे इन्स्टिटयूटचा समाजसेवा विभाग, सी.आर. रंगनाथन कर्णबधिर महाविद्यालय यांच्या सहकार्याने दिव्यांगांच्या सर्वांगीन विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोवा येथे आयोजित होणाऱ्या पर्पल फेस्ट कार्यक्रमाच्या जन-जागृती साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात दिव्यांग व अव्यंग व्यक्तींसाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती.

यावेळी गोवा सरकारचे सामाजिक न्याय मंत्री सुभाष पाल देसाई, महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी,एनएचआरडीएन चे अमन राजपल्ली, राजेश मेहता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर, शिक्षण शास्त्र विस्तार विभाग प्रमुख डॉ. गीता शिंदे, केंद्र संचालक धनंजय भोळे, दिव्यांग अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती सदाकळे (पाटोळे) पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, जिल्हा समन्वयक अशोक सोळंके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, कर्वे समाजसेवा संस्थेचे महेश ठाकूर, आर. जे. संग्राम खोपडे, दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे हरिदास शिंदे, प्रहार संघटनेचे दत्ता भोसले यांचेसह विविध संस्था-संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग व अव्यंग व्यक्ती मोठया संख्येत उपस्थित होते.

हेही वाचा : Deepak Kesarkar News : राज्य सरकार 'शाळेत चला अभियान' राबविणार : दीपक केसरकरांची विधानसभेत घोषणा

वॉकेथॉनमध्ये दोनशे दिव्यांगांसोबत दोनशे अव्यंग व्यक्तींनी सहभाग घेतला. व्यवस्थेसाठी एनएचआरडी नेटवर्कचे पदाधिकारी, पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक शिक्षण केंद्राचे विद्यार्थी तसेच दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील सहभागी संस्था व संघटनेचे कार्यकर्ते स्वयंसेवकांची जबाबदारी पार पाडली. दिव्यांगांसाठीच्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टसाठीचे विविधता आणि समावेशक वॉकथॉन यशस्वी करण्यासाठी पुणे (Pune) व पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरांसह जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत अनेक संस्था, संघटनांनी योगदान दिले.

ऑकेथॉन दरम्यान दिव्यांग व अव्यंग व्यक्तींमधील झालेल्या संवादामुळं दिव्यांगांसाठी समाज्याच्या मुख्य प्रवाहात अधिक समावेशी वातावरण निर्माण व्हावे आणि जागरूकता वाढावी याच उद्देशाने हा अभिनव उपक्रम आयोजित केला होता. वॉकेथॉननिमित्त दिव्यांग व अव्यंग व्यक्ती 40 मिनिटे किंवा 1 किमी चालण्यामुळे परस्पर संवादातून विविधता आणि समावेशासाठीची वचनबद्धता तसेच दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या आव्हानांची सर्वांना माहिती मिळाली.

हेही वाचा : शाळा बंद होणार नाहीत तर वाढणार ! हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

वॉकेथॉनची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळच्या पर्यावरण विज्ञान विभागातील कॉन्फरन्स हॉल पासून झाली व एक किमी अंतरावर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ शेवट झाला. समारोप प्रसंगी गोवा येथे होणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या 'पर्पल फेस्ट 'मध्ये सर्वांना मोठ्या संख्येने सहभागासाठी आवाहन करण्यात आले.

काय आहे इंटरनॅशनल पर्पल फेस्ट

दिव्यांगांच्या सर्वांगीन विकासासाठी गोवा सरकार, भारत सरकार आणि दोनशे पेक्षा जास्त सामाजिक संस्था व आंतरराष्ट्रीय कंपन्या एकत्र येऊन दरवर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हा खास दिव्यांगांसाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. आशिया खंडातील सर्वात मोठा हा पाहिलाच सर्वसामावेशक उपक्रम आहे. या कार्यक्रमात दिव्यांगांच्या विविध सुगम्य क्रीडा स्पर्धा, वॉकेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रम, लीडरशिप फोरम परिसंवाद, रोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळावा, फिल्म फेअर, सहाय्यक तंत्रज्ञान प्रदर्शन, सुगम्य साधने आणि उपलब्धता, दिव्यांगांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल, विवाह जमवण्याचे तंत्र, संवादातून रोजगार अशा विविध विषयी चर्चासत्र आणि बऱ्याच काही गोष्टींचा समावेश असतो. गोवा येथे 8 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान संपन्न होणाऱ्या या उत्सवात हजारो लोक सहभागी होतात. गोवा सरकारसोबत नॅशनल एचआरडी नेटवर्क प्रमुख भागीदार आहे.