बांधकामावरील सळई डोक्यात पडून शाळेतून घरी जाणाऱ्या मुलाचा मृत्यू

पुण्यातील बाणेरमधील गणराज चौकाजवळ ही घटना घडली. या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दुपारी रुद्र हा शाळेतून घरी जात असताना इमारतीवरील सळई अचानक खाली पडली.

बांधकामावरील सळई डोक्यात पडून शाळेतून घरी जाणाऱ्या मुलाचा मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इमारतीच्या बांधकामावेळी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता न घेतल्याने एका नऊ वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना बुधवारी दुपारी पुण्यात (Pune) घडली. रुद्र केतन राऊत (वय ९ वर्षे) असे या मुलाचे नाव असून तो शाळेतून घरी जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातानंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक व साईट इंजिनिअरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police)

 

पुण्यातील बाणेरमधील (Baner) गणराज चौकाजवळ ही घटना घडली. या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दुपारी रुद्र हा शाळेतून घरी जात असताना इमारतीवरील सळई अचानक खाली पडली. रुद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, बांधकाम सुरू असलेली इमारत मुख्य रस्त्यालगतच आहे. त्यामुळे नागरिकांची सततची वर्दळ असते. पण त्यानंतरही सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मुख्य रस्त्यालगत इमारत असूनही खबरदारी न घेतल्याने अपघात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO