शाळा बंद होणार नाहीत तर वाढणार ! हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती 

बालवाड्यांपेक्षा शाळांची संख्या कमी आहे.शाळांना बालवाड्यांना जोडाव्या लागणार आहेत.त्यामुळे कोणत्याही शाळा बंद होणार नाहीत.

शाळा बंद होणार नाहीत तर वाढणार ! हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणा-या शाळा (Schools with less than 20 student strength) किंवा एक शिक्षकी शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही.अनेक  शाळांच्या जवळ खेळाचे मैदान व इतर सर्व सोई -सुविधा असणारी एखादी केंद्रीय शाळा असावी तसेच या शाळेत कोणाला जायचे असेल तर त्यांची तेथे जाण्या-येण्याची सोय करणे इतपत 'क्ल्स्टर स्कूल'चे (Cluster School) धोरण मर्यादीत आहे.तसेच ग्रामीण भागात शाळांपेक्षा अंगणवाड्यांची संख्या जास्त असल्याने या शाळा बंद होणार नाही तर त्यात काही प्रमाणात वाढच होईल,असे माहिती राज्याचे शालये शिक्षण मंत्री दीपक केसरकर (State School Education Minister Deepak Kesarkar) यांनी सोमवारी विधानसभेत दिली. त्यामुळे शिक्षण विभगाने क्ल्स्टर स्कूल योजना गुंडाळी आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शालाबाह्य मुलांबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. तसेच  20 पेक्षा कमी पट संख्या असणा-या शाळा बंद करण्याचे शासनाने धोरण आणले असून दूर अंतरावरील दूर्गम भागातील शाळा बंद करून स्कूल बसच्या सहाय्याने या मुलांना केंद्रीय शाळेत घऊन यायचे,अशी योजना आम्ही वर्तमान पत्रात वाचली आहे.मात्र, त्यामुळे शालाबाह्य विद्यार्थी संख्या आणखी वाढेल.त्यामुळे शासनाचे याबाबत धोरण काय आहे,असा प्रश्न विचारला.या प्रश्नाला उत्तर देताना शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नसल्याचे केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा : Assembly Session News : काय सांगता ! मुंबईतील सरकारी शाळेत एका विद्यार्थ्यांवर १ लाख २ हजार रुपये खर्च

जयंत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले , शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही.उलट नवीन शैक्षणिक धोरणामुळे पूर्व प्राथमिक वर्गांना सामावून घावे लागणार आहे.त्यामुळे अंगणवाड्यांच्या ठिकाणी बालवाटिका म्हणजेच जुनियर केजी, सीनियर केजी चे वर्ग सुरू केले जाणार आहेत.त्याबाबतचे धोरण अस्तित्वात आणले जात आहे.बालवाड्यांपेक्षा शाळांची संख्या कमी आहे.शाळांना बालवाड्यांना जोडाव्या लागणार आहेत.त्यामुळे कोणत्याही शाळा बंद होणार नाहीत.उलट शाळांची संख्या वाढणार आहेत.

दरम्यान,गेल्या काही महिन्यांपासून क्ल्स्टर स्कूलचा मुद्दा चांगला चर्चेत आहे.कमी पाटाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार क्ल्स्टर स्कूलमध्ये आणले जात आहे.त्यामुळे कमी पाटाच्या शाळा बंद पडण्याची शक्यता आहे.त्यातच सुमारे 17 हजार शाळा क्ल्स्टर स्कूलमुळे बंद होण्याचा धोका वर्तवला जात आहे.तसेच उच्च न्यायालयाने सुमोटो क्ल्स्टर स्कूल बाबत याचिका दाखल करून घेतली आहे.मात्र,केसरकर यांनी एकही शाळा बंद केली जाणार नाही, उलट शाळा वाढणार आहेत,असे उत्तर अधिवेशनात दिले.त्यामुळे क्ल्स्टर स्कूलची योजना शासनाने गुंडाळी आहे का ?, अशी चर्चा आता शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे.