डॉ. ताकवले यांनी दूरशिक्षण संचार आणि प्रौढ शिक्षणाचा पाया रोवला!

विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे शनिवारी (दि. १३ मे) निधन झाले. त्यांना विद्यापीठाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत आदरांजली अर्पण करण्यात आली.

डॉ. ताकवले यांनी दूरशिक्षण संचार आणि प्रौढ शिक्षणाचा पाया रोवला!
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डॉ. राम ताकवले (Dr. Ram Takawale) यांनी शिक्षणात नाविन्यपूर्ण प्रयोग करून विद्यापीठाला व एकंदरीत शैक्षणिक व्यवस्थेला (Education System) बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बहुजनांसाठी, वंचितांसाठी आणि इतर सर्वांसाठी शिक्षण (Education) असावे हा त्यांच्या मनाचा आणि कर्तृत्वाचा भाग होता. त्या भूमिकेतून त्यांनी शिक्षण क्षेत्राकडे पाहिले आणि महाराष्ट्र व देशामध्ये दूरशिक्षण (Distance Education) संचार आणि प्रौढ शिक्षणाचा पाया रोवला. त्यातून खऱ्या अर्थाने साक्षरतेचे अभियान राबविले, अशी भावना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Dr. Kabhari Kale) यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे शनिवारी (दि. १३ मे) निधन झाले. त्यांना विद्यापीठाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या श्रद्धांजली सभेत डॉ. काळे यांच्यासह प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितिन करमळकर तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

हेही वाचा : पीएचडी, नेट नसतानाही प्राध्यापक; मंजूर पदांचे काय होणार? 'यूजीसी'चे नवे पोर्टल सुरू

यावेळी बोलताना डॉ. सोनवणे म्हणाले, ‘शिक्षणामध्ये नावाप्रमाणे राम आणणारे हे राम आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या स्मृती आपल्याबरोबर आहे. त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेले कार्य आणि विद्यापीठाचे काम पुढे नेणे हीच खरी आदरांजली ठरेल.

डॉ. राम ताकवले सरांची कारकीर्द अत्यंत प्रेरणादायी आहे. अनेकांच्या आयुष्याला त्यांनी दिशा दिली तसेच अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी दिलेलs योगदान आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी, अविस्मरणीय असल्याची भावना कुलसचिव डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2